Home जालना पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पोलीस दलाचे आवाहन

पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पोलीस दलाचे आवाहन

122

आशाताई बच्छाव

1000481386.jpg

पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पोलीस दलाचे आवाहन
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 20/06/2024
जालना जिल्हा पोलीस आस्थापनेवर जालना पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी दिनांक 19/0 6 /2024 रोजी पासून सुरू झालेली आहे. पोलीस भरती करिता येणारे उमेदवार हे बाहेर गावाहुन व खेड्यापाड्यातून येत असतात. अशा उमेदवारांना रात्री अशा बाहेरून येणाऱ्या उमेदवारांची गाण्याची व्यवस्था नसते त्यामुळे त्यांची गैरसोय होते सामना करणे लागू नये यासाठी जालना जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांकरिता रात्रीच्या मुक्कामाची गैरसोय होऊ नये म्हणून व उमेदवारांना भरती मैदानापर्यंत जाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून जालना शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालय येथे उमेदवारांची रात्रीच्या मुक्कामाची. टॉयलेट/ बाथरूम, पाण्याची मोफत सोय करण्यात आलेली आहे. तरी आतापावेतो सदर ठिकाणी मुक्कामी दररोज 100 पेक्षा अधिक उमेदवार येऊन मुक्कामी थांबत आहेत.
भरतीसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या उमेदवारांना प्रवासात उशीर जरी झाला तरी बसस्टँड, रेल्वेस्टेशन व इतर ठिकाणी गैरसोय होईल अशा ठिकाणी न जाता ”शोभा प्रकाश मंगल कार्यालय बस स्टॅण्ड जवळ शहर वाहतूक शाखा कार्यालया शेजारी” येथे मुक्कामा साठी यावे.व सदर उमेदवारांना सकाळी पोलीस मुख्यालय भरती मैदानावर जाण्यासाठी पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.सदरची व्यवस्था ही उमेदवारांसाठी मोफत करण्यात आली आहे.असे आवाहन जालना पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.