Home जळगाव चाळीसगाव शिवारातून उभ्या खांबावरील विजेच्या तारा चोरी

चाळीसगाव शिवारातून उभ्या खांबावरील विजेच्या तारा चोरी

61
0

आशाताई बच्छाव

1000476358.jpg

चाळीसगाव शिवारातून उभ्या खांबावरील विजेच्या तारा चोरी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील प्रतिनिधी- चाळीसगाव शिवारातून शेतातील 10 इलेक्ट्रीक पोलवरील सुमारे 50 हजार रूपये किंमतीच्या 3800 मिटर लांबीच्या तारा चोरून नेण्याचा पराक्रम चोरट्यांनी केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यंाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव शिवारातील पाटणादेवी रोड लगत असलेल्या इलेक्ट्रीक डीपीपासून जाणार्‍या इलेक्ट्रीक लाईनवरील भरतसिंग नरसिंग पाटील यांच्या शेत गट क्र.152/1/ ब ते शेत गट क्र.153/1/ब व पांडुरंग हिंमत शिंगटे यांच्या शेतामधील इलेक्ट्रीक पोलवर असलेल्या महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहीनीच्या प्रत्येकी 3800 मिटर लांब असलेल्या 50 हजार रूपये किंमतीच्या तीन तारा दि.10 रोजी सायंकाळी 6 ते दि.11 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या.
हा प्रकार शेतकर्‍याच्या लक्षात आल्याने त्याने महावितरण कंपनीला ही माहिती दिली. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आसपास अल्युमिनीअम तारांचा शोध घेतला पण त्या मिळून आल्या नाही. याप्रकरणी महावितरणचे विद्युत सहाय्यक रामेश्‍वर वसंत सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleतळेगावच्या तरुणाची आत्महत्या.. घातपात झाल्याच्या आरोप मृतदेह आणला पोलीस ठाण्यात..
Next articleपुण्यात Porsche नंतर आता मर्सिडीजनं एकाला चिरडलं, अपघाताचा धक्कादायक CCTV VIDEO
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here