आशाताई बच्छाव
जालना शहर महानगरपालिकेतर्फे “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रम साजरी.
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)
उन्हाळ्याच्या दीर्घ सुटटयानंतर विद्यार्थी हे आज दिनांक १५/०६/२०२४ रोजी शाळेत येणार असल्या्ने शाळा प्रारंभ दिवस हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होण्याकरिता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गत्ती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जालना शहर महानगरपालिकेतर्फे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. याकरिता जालना शहर महानगरपालिकेंतर्फे ”पालक अधिकारी” म्हणून १५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.
याबाबत आज मा. आयुक्त श्री.संतोष खांडेकर, मा. उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड तसेच विविध विभागातील कार्यरत अधिकारी यांनी आज दिनांक १५/०६/२०२४ रोजी सकाळी ८:०० वा. जालना शहर महानगरपालिकेंतर्गत १६ शाळांमध्यें भेट देऊन “शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रवेश पंधरवाडयात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मा. आयुक्त यांनी मनपा चंदनझिरा शाळेतील सकस आहाराचा आस्वाद घेवुन शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता श्री. केशव कानपुडे, सहाय्यक आयुक्त , श्री. विजय फुलंब्रीकर, कार्यालयीन अधिक्षक, श्री. सय्यद सऊद, अभियंता, श्री. राजेश बगळे, अभियंता, श्री. संजय वाघमारे, अभियंता, श्री. शोएब कुरेशी, कर अधिकारी, श्री. श्रीकांत गिते, सहाय्यक नगर रचनाकार, श्रीमती तेजश्री शिंदे, सहाय्यक नगर रचनाकार, श्री. रामेश्वर घोळवे, विभागप्रमुख एनयुएलएम, श्री. राहुल देशमुख, मालमत्ता अधिक्षक, श्री. विजय सांगळे, शहर अभियान व्यवस्थापक, श्री. पांडुरंग डाके, शहर अभियान व्यवस्थापक, श्री. माधव पानपट्टे, अग्निशमन अधिकारी, श्री. पंडीत पवार, स्वच्छता विभाग प्रमुख इत्यादीं