Home नाशिक जि प.प्राथमिक शाळा वनसगाव ता.निफाड शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा

जि प.प्राथमिक शाळा वनसगाव ता.निफाड शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा

81
0

आशाताई बच्छाव

1000467447.jpg

जि प.प्राथमिक शाळा वनसगाव ता.निफाड शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा

रामभाऊ आवारे
निफाड नाशिक प्रतिनिधी

वनसगाव तालुका निफाड येथील आय एस ओ मानांकन प्राप्त आदर्श, जि.प. सेमी इंग्रजी प्राथमिक विद्या मंदिर शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी औक्षण करून, गेटवर रांगोळी काढून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक समाधान पवार सर यांची नवीन बलेनो गाडी ,व दिपक घाडगे यांच्या पिक अप गाडीतून काढण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब यशवंत शिंदे होते. प्रतिमा पुजन शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व केंद्रिय पत्रकार संघाचे संघटक ,वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे सर यांनी केले.व पुष्पहार अर्पण भिमराव डुंबरे, केशव शिंदे यांनी केले. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा पोलीस पाटील संतोष अस्वले यांनी सरस्वती पुजन पुजन केले.पत्रकार रामभाऊ आवारे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. अंगणवाडी क्रमांक 1 च्या मदतनीस कांताबाई रायते सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके,व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष जाधव, संजय शिंदे, विक्रम कापडी, संदीप डुंबरे,शरद शिंगाडे, नरेंद्र खैरनार, नामदेव शिंदे,ज्योती कापडी, दिनकर जाधव, ज्ञानेश्वर शिंदे,छोटु शिंदे, विकास शिंदे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास मुख्याध्यापक आनंदा राजगुरू,शिक्षक राजेंद्र कापडणीस सर,समाधान पवार सर, दिपक माहेवार सर,शुभांगी देशमुख मॅडम,सुनिता शेले, प्रकाश शेले,कांताबाई रायते, सुवर्णा शिंदे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना चाॉकलेट ,मसालेभात व शिरा वाटप करण्यात आला.सूत्रसंचालन दिपक माहेवार सर यांनी केले,मुख्याध्यापक आनंदा राजगुरू आभार

Previous articleविविध आंबेडकरी गटांना एकत्र आणण्याकरिता भंडारा येथे चर्चासत्र संपन्न.
Next articleभूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे:- आमदार लहू कानडे…..         
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here