Home बीड आरटीओ कडून होणाऱ्या दंडात दुप्पट ते पाचपट वाढ; वाहन चालविणाऱ्यांनो नियमांचे पालन...

आरटीओ कडून होणाऱ्या दंडात दुप्पट ते पाचपट वाढ; वाहन चालविणाऱ्यांनो नियमांचे पालन करा

161

आशाताई बच्छाव

1000466045.jpg

आरटीओ कडून होणाऱ्या दंडात दुप्पट ते पाचपट वाढ; वाहन चालविणाऱ्यांनो नियमांचे पालन करा

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: १५ जून २०२४ आत्तापर्यंत वेगवेगळ्या नियमांमध्ये आरटीओ कडून वाहन चालकांना देण्यात येणाऱ्या दंडामध्ये चक्क दुप्पट ते पाचपट वाढ झाल्याने वाहन चालकांनी नियम तोडून वाहन चालविल्यास यापुढे मोठे दंड भरण्यास तयार राहावे, अन्यथा नियमांचे पालन करून वाहन चालवावे. मोटार वाहन कायद्यानुसार सीट बेल्ट विना गाडी चालवल्यास पूर्वी २०० रुपये दंड गाडी मालकाला आकारण्यात येत होता आता १००० रुपये दंड मोजावे लागणार आहे. १४ वर्षाखालील मुले मुली गाडी चालवत असतील तर गाडी मालकाला पूर्वी २०० रुपये दंड आकारण्यात येत होता आता १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवल्यास पूर्वी ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता आता १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तेव्हा वाहन चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून गाडी चालवावी अन्यथा आर्थिक दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Previous articleजिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण
Next articleसेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश बोर्डे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.