आशाताई बच्छाव
संतप्त ग्रामस्थांचा काकडगाव फाट्यावर रास्ता रोको नामपूर वार्ताहर वामन शिंदे
नामपूर मालेगाव रस्त्यावरील कॉलेज शेजारील पूल हा धोकेदायक पुल झाला असून या पुला मुळे मंगळवार दिनाक ११ रोजी रात्री भूषण गांगुर्डे व दिनेश रौदल या तरुणाचा अपघातात पीक अप गाडी व मोटासायकल असा सामोरा समोर अपघात झाला असून या घटनेच्या निषेधार्थ नामपूर परिसरातील नागरिकांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले होते
या वेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण सावंत काकड गावचे सरपंच संजय पवार विनोद पाटील बाळासाहेब भदाणे आपल्या भाषनात सदर पुलाच्या कामाची चौकशी झाली पाहिजे बोगस ठेकेदार वरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
मयत झालेल्या कुटू बियाना प्रतेकी दहा लाखाची भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली रात्रीच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात मोठ्याप्रमाणात गर्दी जमा झाली होती जो पर्यंत सार्वजनिक बाधकाम विभाग लेखी हमी घेत नाही तो पर्यंत आंदोनकर्त्यांनी आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली या मुळे या ठिकाणी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता अखेर सहायक पोलिस निरीक्षक पुरू शुत्त्म शिरसाठ यांनी ठेकेदार वरती गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे जमावाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला विविध मागण्याचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना देण्यात आले या वेळी काकड गाव सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते
हे काम अमित बधान व अभिजित भुसे या ठेकेदारांनी घेतले असून राजकीय नेत्याचे पाठबळ त्यांना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे बागलाण तालुक्यात असंख्य ठिकाणी अशीच लोकप्रतिनिधींची आशीर्वादाने बोगस कामे चालू आहेत जनतेने आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे
दीपक पगार आंदोलक
मयत भूषण गांगुर्डे रा मोरा ने वय ३५ व दिनेश रौदल राहणार बिजोरसे वय ३२ हे दोन्ही कुटु बातील कर्ते होते लहान लहान मुले असून पत्नी आई वडील आहेत या दुर्देवी घटनेमुळे काकड गाव. मोरा ने बिजो रसे गावावर शोककळा पसरली असून अनेक घरामधे चुलीच पेटल्या नाहीत