Home Breaking News देवळा तालुक्यातील तिसगाव येथे वीज पडून आकाश शरद देवरे (वय२०) व एक...

देवळा तालुक्यातील तिसगाव येथे वीज पडून आकाश शरद देवरे (वय२०) व एक वासरू मरण पावले .

598

Yuva maratha news

1000452654.jpg

दि.९/६/२०२४
भिला आहेर
देवळा प्रतिनिधी :- देवळा तालुक्यातील तिसगाव येथे वीज पडून आकाश शरद देवरे (वय२०) व एक वासरू मरण पावले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तिसगाव येथे आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली त्याचबरोबर वारा देखील असल्याने बाहेर अंगणात असलेले मुके जनावरे सोडण्यासाठी आकाश घराबाहेर निघाला तोच त्याच्यावर वीज कोसळली व तो जमिनीवर कोसळला त्याला मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले व आकाशच्या शेजारी असलेले गायीचे वासरू देखील मृत्यू पावले . पावसाबरोबरच वीज आणि वारा जास्त असल्याने तिसगाव येथे कांद्याचे एक शेड व एका घराचे देखील नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर उमराणे ता.देवळा येथे देखील वादळामुळे एक कांद्याचे शेड उडाल्याने रस्त्याने जात असलेले देविदास भाऊराव आहेर(वय-४०) तिसगाव हे वादळ आणि पावसापासून सरंक्षण व्हावे यासाठी रस्त्याला असलेल्या कांद्याच्या शेडमध्ये आसरा घेण्यासाठी आले असता वादळाने शेड उडाल्याने त्यांच्या डोक्यात शेडचा लोखंडी अँगल पडल्याने त्यांचा देखील मृत्यू झाला. तिसगाव येथे एकाच दिवशी दोन जणांचा वादळी वारा व विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.