Home Breaking News खळबळजनक…. नाशिकच्या दाभाडीत साँ मिलच्या आरा मशिनमध्ये अडकून एकाचा दर्दनआक मृत्यू! धडापासून...

खळबळजनक…. नाशिकच्या दाभाडीत साँ मिलच्या आरा मशिनमध्ये अडकून एकाचा दर्दनआक मृत्यू! धडापासून शरीर वेगळे!

253
0

आशाताई बच्छाव

1000459006.jpg

मालेगाव (प्रविण क्षीरसागर युवा मराठा न्यूज नेटवर्क):- रोकडोबानगर येथील एका लाकडाच्या वखारीत लाकूड कापण्याच्या पात्यात सापडून गोकुळ उखा पवार (२८) तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात त्याचे शिर व धड वेगळे झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोकुळ हा रोकडोबानगर जवळच असलेल्या अन्नपूर्णा वखार येथे कामगार म्हणून कामाला असल्याचे कळते. तो बुधवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता कामावर गेला. त्या ठिकाणी तो लाकुड कापण्याच्या पात्याच्या दिशेने चालत जात असताना कटर पात्यावर पडला. यात त्याचे शिर धडावेगळे झाल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश गुंजाळ यांच्यासह छावणी पोलीसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. गोकुळ याचा मृतदेह मालेगावी सामान्य रुग्णालयात शवविच्छादनासाठी आणण्यात आला आहे. गोकुळ याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Previous articleदेवळा तालुक्यातील तिसगाव येथे वीज पडून आकाश शरद देवरे (वय२०) व एक वासरू मरण पावले .
Next articleसत्कार घेतला पण गँगस्टर गजा मारणेला ओळखत नाही, निलेश लंके यांचा अजब दावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here