आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत उष्माघाताने ६ हजार कोंबड्यांचा मृत्यू: ८ लाखाचे नुकसान आनियामित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठा उच्च ही खंडित.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
. अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून उन्हाचा परा सतत वाढत असल्याने नजीकच्या मोशी तालुक्यातील पाळा या ग्रामीण गावात सुमारे ६ हजार कोंबड्यांचा बळी गेला. हा मृत्यू नैसर्गिक आपत्ती असून त्या कोंबड्या उष्माघाताने मृत झाल्याच्या बाबीवर तज्ञांनी शिक्कामोर्तेब केला आहे. अचानक वडवलेल्या या संकटामुळे फुकट पालन रुपेश धनराज राणे व मोहन गुणवंत ढोके यांचे सुमारे ८ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने त्यांना मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे. मृत कोंबड्यांमध्ये राणे यांच्या मालकीच्या ४ हजार कोंबड्या असून ठोके यांच्या मालकीच्या २हजार कोंबड्या आहेत. सदर कोंबड्यासाठी त्या ठिकाणी शेड असून ते थंड करण्यासाठी कुलरची व्यवस्था ही करण्यात आली आहे. परंतु भार नियम आणि मान्सूनपूर्व मेंटेनन्स तसेच इतर कारणांनी सतत वीज खंडित राहते. परिणामी कोंबड्यांना नियमितपणे पाणीही पुरता आले नाही. अशाप्रकारे एका मागून एक आलेल्या संकटामुळे सदर निष्पाप प कोंबड्यांना आपला जीव गमावा लागला. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील पशुधन पर्यवेक्षक विजय निकम यांच्या मते कोंबड्यांचे शेड हे टीन पत्राचे आहे. त्यामुळे कोंबड्यांना उष्माघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. मोर्शीत उष्माघाताने कोंबड्या मृत झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामागे वीस पुरवठा खंडित असल्याचे कारण सुद्धा पुढे आले आहे. त्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला किती कोंबड्या मृत झाला याबाबत सविस्तर अहवाल सोमवारी मागतो असे डॉक्टर पुरुषोत्तम सोळंके पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी सांगितले आहे. असे नुकसान वारंवार होऊ नये म्हणून शासनाने सबसिडीवर सोलर पॅनलचे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ती मिळाल्यास नुकसान कमी होऊ शकते यासोबतच यावर्षी नुकसान की भरपाई मिळण्यात यावी असे रुपेश राणे पोल्ट्री फार्मचे संचालक यांनी म्हटले आहे.






