Home अमरावती १० लाखांची खते,बियाणे सील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

१० लाखांची खते,बियाणे सील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

131

आशाताई बच्छाव

1000426450.jpg

१० लाखांची खते,बियाणे सील

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

तीन कृषी केंद्र धारकांना करणे दाखवा नोटीस.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख विभागीय संपादक.

भातकुली,(अमरावती)
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील आमचे प्रतिनिधी श्री धनराज खर्चान यांच्या माध्यमातून

भातकुली – कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची तपासणी सुरू केली असून तपासणी दरम्यान काही ठिकाणी बियाणे
अधिनियमातील व रासायनिक खत नियंत्रण आदेशातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऐकून सहा लाख 70 हजार रुपयांच्या बियाण्याच्या व 3 लाख 60 हजार रुपये खताच्या विक्री बंदच्या आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये कपाशी ,सोयाबीन पिकाचे तसेच सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा समावेश आहे. तीन कृषी सेवा केंद्राला बियाणे अधिनियमाची पूर्तता न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

विवरण पत्र 1 व 2 उपलब्ध नसणे, विक्री नोंदवही न ठेवणे तसेच त्यामुळे मध्ये वेळीच नोंद घेऊन अद्यावत न करणे, परवाण्यात समाविष्ट न करता निविष्ठा विक्रीकरिता उपलब्ध ठेवणे, बियाणे कुठून खरेदी केले याची अधिकृत पावती नसणे, अनाधिकृत कृषी निविष्ठांची साठवणूक करणे ही कारणे तपासणी केली असता भरारी पथकाला आढळून आली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही निविष्ठा खरेदी करताना अधिकृत परवाना धारकाकडून खरेदी कराव्यात तसेच निविष्ठा खरेदी करताना त्याबाबतची विहित केलेली खरेदी पावती घ्यावी त्यामुळे अधिकृत व निष्कृष्ट दर्जाचे निविष्ठा खरेदी करण्यापासून शेतकऱ्याचे संरक्षण होऊ शकेल असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भातकुली प्रमोद खर्चान व पंचायत समितीचे कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण यांनी केले आहे.या वेळी अडागळे मंडळ कृषी
अधिकारी,अविनाश देशमुख कृषि पर्यवेक्षक उपस्थित होते