Home महाराष्ट्र आता तरी सुधरा रे…. यावर्षी संपूर्ण देशात भीषण पाणीटंचाई!

आता तरी सुधरा रे…. यावर्षी संपूर्ण देशात भीषण पाणीटंचाई!

127

आशाताई बच्छाव

1000423626.jpg

पुणे, हवेली प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : यावर्षी भीषण पाणीटंचाई, संपूर्ण देशामध्ये यावर्षी भीषण पाणीटंचाई पाहायला मिळाली आहे. देशातील सर्व धरण गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टक्केवारी मध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे,छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, धाराशिव, बीड, नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाई पाहायला मिळाले. त्यामध्ये सर्वात जास्त पाणीटंचाई ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहायला मिळाली. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शहरांमध्ये दर आठ दिवसाला टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. तेथील नागरिकांना पाणी दर आठ दिवसांनी मिळत असल्यामुळे खूप पाणी जपून वापरावे लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना टँकर विकतही घ्यावे लागत आहे. पैठणच्या जवळ असलेले जायकवाडी धरण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याची सरासरी घसरली पाहायला मिळते. भारताची राजधानी दिल्लीत देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणीटंच पहायला मिळत आहे.एकंदरीत काय तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भीषण पाणीटंचला सामोरे जावे लागत आहे.

Previous articleबोराखेडी पोलीस स्टेशनच्या वतीने पाणपोई पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांचा उपक्रम
Next articleठकाजी वीर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.