Home बुलढाणा त्‍या नराधमाने मावस बहिणीवर ठेवली पापी नजर आरोपीस दहा वर्षे कारावास जिल्हा...

त्‍या नराधमाने मावस बहिणीवर ठेवली पापी नजर आरोपीस दहा वर्षे कारावास जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय…

135

आशाताई बच्छाव

1000417348.jpg

त्‍या नराधमाने मावस बहिणीवर ठेवली पापी नजर आरोपीस दहा वर्षे कारावास जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय…
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
बुलढाणा:-लग्नाचे आमीष दाखवून मावस बहीणीस पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या आरोपी मावस भावाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय मुलीस आरोपी मावस भावाने लग्नाचे आमीष दाखवनू पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मावस भावाविरूध्द पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मुंढे यांनी करून दोषारोपपत्र बुलढाणा येथील विशेष न्यायालयात दाखल केले होतेविशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी या प्रकरणी सरकारी पक्षाची बाजु मांडली सरकारी पक्षाकडून १० साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी आणि तिची आई फितूर झाली होती तरीही त्यांच्या उलट तपाससात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होईल इतपत पुरावा मिळाला. त्यामुळे, जिल्हा व सत्र न्यायायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी मावस भावास दहा वर्षांचा सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे.