Home वाशिम शहरातील मान्सूनपुर्व कामांकडे वाशिम नगर परिषदेचे दुर्लक्ष – श्रीमती करुणाताई कल्ले

शहरातील मान्सूनपुर्व कामांकडे वाशिम नगर परिषदेचे दुर्लक्ष – श्रीमती करुणाताई कल्ले

169

आशाताई बच्छाव

1000411169.jpg

शहरातील मान्सूनपुर्व कामांकडे वाशिम नगर परिषदेचे दुर्लक्ष – श्रीमती करुणाताई कल्ले
प्रभागा दोन मधील तुंबलेल्या नाल्या व नाले जेसीबीव्दारे साफ करण्याची मागणी
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- मे महिना संपून शेतकर्‍यांसह सर्वांना जुन महिन्याच्या मान्सुनचे वेध लागले आहेत. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांना मान्सुनपुर्व कामाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक दोन विनायक नगर भागातील रस्ते व नाल्यांची शोचनिय अवस्था झाली असून अनेक नाल्या व नाले तुंबलेल्या आहेत. नगर परिषदेने मान्सूनपुर्व कामामध्ये या नाल्या जेसीबीने साफ करण्यासह या भागातील अर्धवट राहीलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करुन नागरीकांना पावसाळ्यात होणार्‍या त्रासापासून दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगरसेविका श्रीमती करुणाताई राजु कल्ले यांनी २२ मे रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, मान्सूनचे सर्वांना वेध लागले असून त्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे उरकून घेण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. मात्र शहरातील विविध प्रभागात मान्सूनपुर्व कामांना गती मिळाली नसून प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध नाल्या व मोठे नाले कचर्‍याने तुडुंब भरलेल्या आहेत. पावसाळ्यात ह्या नाल्यावरुन पाणी वाहून दुर्गंधीयुक्त पाणी नागरीकांच्या घरात जावू शकते. या बाबीकडे लक्ष देवून नगर परिषदेने जेसीबीव्दारे मोठे नाले व नाल्या साफ कराव्या. यासोबतच विनायकनगर कडे जाणार्‍या रस्त्यावर खूप गड्डे आहेत. त्यामध्ये बसस्थानक ते समाजकल्याण कार्यालय, गजानन महाराज चौक ते पोलीस ग्राउंड तसेच विनायकनगर भागातील अंतर्गत रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. यासोबतच गव्हाणकरनगर, नाईकनगर, नवीन बालाजी मंदिर जवळील लोनसुने चौक ते गव्हाणकरनगर जाणार्‍या अर्धवट रस्त्यावर मुरूम टाकणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल साचून विद्यार्थ्यांसह वृध्दांना मोठा त्रास सोसावा लागतो. त्यामुळे प्रभागातील कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकण्यासह प्रभागातील सर्व मोठे नाले व नाल्या स्वच्छ करुन देण्यात याव्या अशी मागणी श्रीमती करुणाताई कल्ले यांनी केली आहे.

Previous articleपावसाळा सुरू होण्याआधी गजबजला बैल बाजार
Next articleशिवाजी विद्यालय ईटान च्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उंच भरारी निकाल – 96.92%
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.