Home पुणे वारजे आयडॅाल २०२४ गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ..

वारजे आयडॅाल २०२४ गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ..

139

आशाताई बच्छाव

1000411165.jpg

वारजे आयडॅाल २०२४ गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ..

पुणे.वारजे:- युवा मराठा न्युज प्रतिनिधि.विलास पवार. गेले तीन दिवस सुरू असलेल्या वारजे आयडॅाल २०२४ कराओके गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. भिमराव ( अण्णा ) तापकीर यांच्या शुभहस्ते पार पडला .
या स्पर्धेस जवळपास २५० ऑनलाईन , ऑफलाईन नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांपैकी १५० स्पर्धकांनी प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला . यापैकी ३० स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून या ३० पैकी ७ क्रमांक या गायन स्पर्धेत काढण्यात आले आणि ४ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली .
यंदा प्रथमच आयोजन केलेल्या वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या मानकरी अंजली पांगारे या गायिका ठरल्या . द्वितीय क्रमांक प्रिती वाटे , तृतीय क्रमांक करण गायकवाड , चतुर्थ क्रमांक साई तामकर , पाचवा क्रमांक सुगंध पंडित , सहावा क्रमांक मोनिका ओड , सातवा क्रमांक भीमा पंडित , अश्या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट गायनाने वारजे आयडॅाल २०२४ हा पुरस्कार पटकावला .
या गायन स्पर्धेच्या बक्षीस समारंभास मा. आमदार भिमरावआण्णा तापकीर यांच्यासह गणेश वरपे अध्यक्ष खडकवासला , सचिन मोरे अध्यक्ष खडकवासला , मा. प्रभाकर भोरकडे जिल्हा परिषद सदस्य , नाट्य परिषदेचे खजिनदार अशोक जाधव , सुप्रसिद्ध गायक अनिल घाडगे , गायक संजय मरळ , स्वीकृत नगरसेवक संजय भोर , आकांक्षा नारी मंच अध्यक्ष मनीषा दांगट , खडकवासला अध्यक्ष भावना पाटील , राष्ट्रवादीचे देवेंद्र सूर्यवंशी , मा. रजनी पाचंगे , सुभाष अग्रवाल , चुनीलाल शर्मा , चेकमेट टाइम्सचे धनराज माने यांच्यासह संयोजन समितीचे फिल्म निर्माता राजीव पाटील , निवेदक अशोक उनकुले यांच्यासह स्पर्धक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अशोक जाधव , संजय मरळ , जितेद्र भुरूक , अनिल घाटगे यांनी काम पाहिले . सुत्र संचालन अशोक ऊनकुले , चंद्रकांत पंडीत यांनी केले .
या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट स्वीकृत नगरसेवक यांनी केले होते .
आपला.सचिन दशरथ दांगट
स्वीकृत नगरसेवक पुणे मनपा

Previous articleदहावीत अमरावती विभागातून ९५.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण: अमरावती विभागात वाशिम पहिला स्थानावर अमरावती त सर्वात मागे.
Next articleपावसाळा सुरू होण्याआधी गजबजला बैल बाजार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.