Home उतर महाराष्ट्र शिवा-तेजा ठरले ‘सोनई केसरी ! तीनशे बैलगाडे सहभागी रंगला ‘भिर्रर्र..’ चा थरार

शिवा-तेजा ठरले ‘सोनई केसरी ! तीनशे बैलगाडे सहभागी रंगला ‘भिर्रर्र..’ चा थरार

175

आशाताई बच्छाव

1000411110.jpg

शिवा-तेजा ठरले ‘सोनई केसरी !

तीनशे बैलगाडे सहभागी रंगला ‘भिर्रर्र..’ चा थरार

सोनई, (कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)
यात्रा महोत्सवनिमित्त धनगरवाडी शिवारात आज झालेल्या बैलगाडा स्पर्धेत भाटेपुरी (जालना) यांच्या शिवा व तेजा या बैलजोडीच्या तांग्याने ‘सोनई केसरी’चा बहुमान मिळविला. त्यांनी मोटारसायकल बक्षीस जिंकले. स्पर्धेतील ‘भिर्रर्र’ आणि ‘गाडी आली.. गाडी आली..’ च्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

गर्दीचा उच्चांक, वाजंत्रीचा ताफा अन् छातीत घस्स.. होणारा प्रसंग पाहण्यासाठी परिसरातील पंधरा हजारांहून
अधिक हौशी ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या वेळी स्पर्धेचे समन्वयक प्रणव दरंदले, सोनईचे सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे, माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, मुळा बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, अप्पासाहेब निमसे, डॉ. रामनाथ बडे उपस्थित होते. दुसऱ्या क्रमांकाचे फ्रीज बक्षीस नाशिक येथील जय-पराजय ग्रुपच्या घेतले.

‘मन्या-पक्ष्या’ बैलजोडीने जिंकले, तर करमाळा येथील योगेश हजारे यांच्या “चिक्या सुंदर” जोडीने वॉशिंग मशीन बक्षीस जिंकले.

मोरया चिंचोरे रस्त्याला आज यात्रेचे स्वरूप आले होते. राज्यातील तीनशेहून अधिक बैलगाडे स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे समालोचन मयूर तळेकर यांनी केले. झेंडा पंच म्हणून भरत जाधव व बाळू तमनर यांनी काम पाहिले. यात्रा कमेटी व शंकरराव गडाख युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम

Previous articleदहावीच्या परिक्षेत इरफान शेखने मिळविले ८९.८० गुण.
Next articleकॉफी रोखण्यासाठी अमरावती बोर्डाचा पुढाकार: ७ जन वर्षा भरासाठी निलंबित, शिक्षण मंडळाच्या प्रभारी अध्यक्षांची माहिती.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.