आशाताई बच्छाव
दहावीच्या परिक्षेत इरफान शेखने मिळविले ८९.८० गुण.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड मुखेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेत मुखेड शहरातील गुरूदेव विद्या मंदिर प्रशालेचा विद्यार्थी इरफान महेताब शेख याने ८९.८० टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे त्याबद्दल इरफानचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.
नुकतच दिनांक २७ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील गुरूदेव विद्यामंदीर विद्यालयाचा विद्यार्थी व वार्ताहार महेताब शेख यांचे चिरंजीव इरफान महेताब शेख या विद्यार्थ्यांने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ८९.८० टक्के मिळविले आहेत.यात त्याला मराठी विषयात ७१,हिंदी विषयात ७७, इग्लिंश ८५, गणित ९५, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९३ व सामाजिकशास्त्रे ९९ गुण मिळाले आहेत.या यशाचे शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच गुरुजणांना दिले आहे.या यशाबद्दल आमदार डाॅ.तुषार राठोड, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर,प.स.चे माजी उपसभापती सुभाष पाटील दापकेकर,गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे,माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पा.सकनुरकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजु पा. रावणगावकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे,भाजपाचे शहराध्यक्ष राजेश गजलवाड,केंद्रप्रमुख डाॅ.शिवाजी कराळे, मुख्याध्यापक येवते, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे आब्दुल बशीर माजीद, डोरनाळीचे सरपंच प्र.हुल्लाजी पाटील शिंदे,उपसरपंच प्र.प्रकाश पा.शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलबंरकर, राष्ट्रवादीचे जयभिम सोनकांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे असद बल्खी सह सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष,सचिव, उपाध्यक्ष,पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इरफानचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
चौकट…
आजीने भरवला नातवास पेढा…
दहावी परिक्षेच्या निकालात नातवाने चांगले मार्क्स मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आजी ग्रामपंचायत सदस्या घुडमाबी शेख व भाऊ इमरान शेख यांनी इरफानचे कौतुक करुन पेढा भरवुन आर्शिवादरुपी शुभेच्छा दिल्या आहेत.






