Home अमरावती सव्वा आठ रुपयाच्या झोपेच्या गोळीची तब्बल विक्री: १९३ गोळ्या सह अमरावतीत एकाला...

सव्वा आठ रुपयाच्या झोपेच्या गोळीची तब्बल विक्री: १९३ गोळ्या सह अमरावतीत एकाला अटक”बटन “चा खेळ.

135

आशाताई बच्छाव

1000410922.jpg

सव्वा आठ रुपयाच्या झोपेच्या गोळीची तब्बल विक्री: १९३ गोळ्या सह अमरावतीत एकाला अटक”बटन “चा खेळ.
_________

दैनिक युवा मराठा
पी.एन
देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती मधील नागपुरी गट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाल खडी परिसरात एक जण सव्वा आठ रुपये मूळ किंमत असलेल्या झोपेच्या गोळ्याची दीडशे रुपयांना नशेसाठी विक्री करत होता. या तरुणाला शुक्रवारी (२४मे) रोजी रात्री अटक केली आहे. त्याच्याकडून २८हजार९५० रुपयाच्या तब्बल १९३ गोळ्या जप्त करण्यात आले आहे. जुनेद खान मेहमूद खान (वय २९रा. रोशन पुरा मुर्तीजापुर, ह.मु. पाटीपुरा अमरावती.) असे अटक आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय विक्री करणे किंवा साठा करणे गुन्हा आहे. लाल खडी परिसरात मागील काही दिवसापासून झोपेच्या गोळ्याची नशेसाठी विक्री सुरू असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाली होती. या गोळीला’बटन’असा”कोडवर्ड”आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करून जुनेदला गोळ्याचा पुरवठा करणाऱ्याचा शोध घेणार असल्याचे पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी सांगितले आहे. पोलिसांसोबत केलेल्या कारवाई जप्त केलेल्या गोळ्या या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय वप्रीस्किप्शन शिवाय विक्री करता येत नाही. या गोळ्यांचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आम्ही सखोल तपास सुरू केला असून दोषी आढळणाऱ्या वर कारवाई करण्यात येणार आहे. असे स्वाती भरडे औषधी निरीक्षक यांनी म्हटले आहे सदर गोळ्यावर बँक क्रमांक खोडलेला दिसून आला आहे. जप्त केलेल्या झोपेच्या गोळ्या १३स्ट्रिपवरील बॅच क्रमांक, मॅन्युफॅक्चर वर व एक्सपायरी डेट खोडतोड केली आहे. त्यामुळे या गोळ्या आरोपीने कुठून आणल्यात याबाबत माहिती घेण्यात अडचणी येत आहे. आरोपीकडून त्याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे. गोळ्याची नशेसाठी अवैध विक्री आरोपीकडून केली जात आहे. या गोळ्या मनोविकार रुग्ण किंवा असह्य दुखणे असलेल्या रुग्णाला डॉक्टर देऊ शकतात. या गोळ्या मधील घटकांचा परिणाम थेट मेंदूवर होतो. घोड्याचा अति वापर केल्यास चक्कर येणे, धडधड वाढणे त्रास होतात. डोळ्याची मात्र जास्त झाल्यास मेंदूवर या गोळ्या मधील घटकाचा परिणाम होतो व व या गोळ्या मुळे जीव सुद्धा जाऊ शकतो असे डॉ. रवी भूषण वैद्यकीय अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधी माहिती दिली.

Previous articleखामगावात अज्ञाताकडून धारधार शस्त्राने एकाचा खून!बस स्टँड समोरील घटना…
Next articleरा.प.म.”शिवशाही”पेक्षा लाल डब्बा परवडला, पडदे घाणेरडे सीसीटीव्ही, चार्जर बंद; प्रवाशांना मिळेनात सुविधा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.