आशाताई बच्छाव
देगलूर महाविद्यालयातील विद्यार्थ्याना शिकविणार कोट्याचे शिक्षक.
देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)
देगलूर :– अलिकडच्या काळात ग्रामीण भागातून MBBS, JEE व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यस्थान राज्यातील कोटा , हैद्राबाद, पुणे व नांदेड येथे जावून खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये भरमसाठ फिस भरून शिक्षण घेना-या विद्यार्थ्याची संख्या प्रचंड वाढत आहे.
सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याना राज्यस्थानमधिल कोटा, हैद्राबाद , पुणे अथवा नांदेड यासारख्या महानगरात जाऊन खाजगी शिक्षण घेणे शक्य होत नाही .
अशा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याना त्या दर्जाचे शिक्षण देगलूर महाविद्यालयात प्राप्त व्हावे या उद्देशाने कोटा, राज्यस्थान येथिल
जोखम प्रसाद (जे.पी. चंद्रा) कोर्स समन्वयक आणि अडत व्यापारी शिक्षण संस्था यांच्यात करार करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी स्पर्धात्मक परीक्षा JEE, NEET आणि MHT-CET चे वर्ग देगलूर महाविद्यालयात सुरू करण्यात येनार आहेत. ही बॅच 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी (क्रॅश कोर्स) जून-2024 पासून सुरू होनार आहे. राजस्थान कोटा येथील श्री जोखम प्रसाद ( जे.पी. चंद्रा) यांची भौतिकशास्त्र विषयासह वर्ग चालवण्यासाठी मुख्य समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
आज दि. 13/05/2024 जे.पी. चंद्रा यांनी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांसाठी तज्ञ शिक्षक उपलब्ध केले आहेत. JEE , NEET आणि MHT-CET इत्यादी अभ्यासक्रमाचे शिक्षण आता देगलूर महाविद्यालयातच प्राप्त होनार आहे
प्रस्तुत क्लासेसचा जास्तीत जास्त विद्यार्थानी लाभ घ्यावा असे अवाहन देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कोर्स समन्वयक डॉ. व्यंकटेश शेरीकर यांनी केले आहे.






