Home अमरावती अमरावती येथे सदा शांती बालगृहात पार पडला धून अनाथ मुलीचा आदर्श विवाह:...

अमरावती येथे सदा शांती बालगृहात पार पडला धून अनाथ मुलीचा आदर्श विवाह: अडगूळवार दांपत्याने केला कन्यादान.

157

आशाताई बच्छाव

1000371382.jpg

अमरावती येथे सदा शांती बालगृहात पार पडला धून अनाथ मुलीचा आदर्श विवाह: अडगूळवार दांपत्याने केला कन्यादान.
___________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथील बालसाधनातील दोन अनाथ मुलींचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार व पोलीस आयुक्त नवीन केंद्र रेड्डी आणि त्यांच्या अर्धागिनी, अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके, आचार्य डॉ. कमलाताई गवई, माजी खासदार अनंतराव गुढे आदींच्या या विवाह सोहळ्याला उपस्थिती होती. सदा शांती बाल सदन आणि सदा शांती आधार गृहाच्या वतीने बाळसदांच्या परिसरात हा विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ रोड स्थित वृंदावन कॉलनी, किरण छावणी येथे हे बाल सदन आहे. लायन्स क्लबचे पदाधिकारी राजू अदुगुलवार व स्वाती अडगुलवार दांपत्याने कन्यादान केले. सदा शांती आगरगृहातील रूपाली चा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील सारोळा मारुती येथील किशोर ढगे यांच्याशी तर सपनाचा विवाह अकोला जिल्ह्यातील अंबाशी येथील योगेश टाले या युवकाची हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. बाल सदांनचे डॉ एस पी इंगळे व कुमुदिनी इंगळे या दांपत्याने या दोन्ही मुलीचा आतापर्यंतचा सांभाळ केला. विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव कुणी दिली इंगळे यांनी तर संचालन प्रा.डा. प्रफुल्ल गवळी यांनी केले. यावेळी महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त विलास मरसाळे, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्य पालन अधिकारी डॉ. कैलास घोडके, पोतदार अधिकारी शिल्पा पवार, नरसम्मा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदन पाट, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, समाजसेवक डॉ. गोविंद कासट, सुनील राणा, धीरज हीवशे, डॉ. सोनाली देशमुख डॉ. राजबाला अग्रवाल, डॉ.प्रा. पंकजा इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. 32 वर्षापासून कामकाज सदाशांती बालगृह हे गेल्या 32 वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. आई-वडिलांच्या प्रेमाविना ज्यांचे बालपण हरवले किंवा काही कारणास्तव उध्वस्त झाले. यांना या जगात कुठेच आधार नाही अशा चिमुकल्या मुलींना मायेचा हात येथे दिला जातो. त्यांच्या जगण्याची नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य हे बालगृह अविरत करत आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींना या ठिकाणी ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनचा उपाय म्हणून शहरातील प्रतिष्ठित नागरिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साह्याने दोन मुलींचा विवाह जुळून आणला गेला. संस्थेने पुढाकार घेऊन अनाथ मुलींचा विवाह घडवून आणला. अडगुलवार दांपत्याने त्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन इतरांनीही असे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केले नो दाम्पत्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.