आशाताई बच्छाव
माझी आई “सुभद्राबाई ” आज मातृदिना निमित्त आईसाठी…आईदिन विशेष.. मुरलीधर डहाके… माहोरा माझ्या आईने मला शेतीत काबाड कष्ट करून शिकविले . पण मला नोकरी लागली नाही. त्यावेळेस आईने मला समजले की तू आता हिंमत सोडू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असा धीर दील्या नंतर माझे मन खूप भरून आले. आईने सांगितले की तू आता व्यवसायाकडे वळ मी आईचे म्हणने एकले त्यानुसार मी छोटासा व्यवसाय सुरू केला आईच्या आशिर्वादाने माझा व्यवसाय व्यवस्थित चालू झाला. आईचा आशीर्वाद हा ईश्वरा पेक्षा कमी नसतो याची प्रचिती मला आली.आई सारखे दैवत कोठेच नाही. याची मला स्वतः खात्री पटली आहे. आई मायेचा सागर हे मी स्वतः ईश्वराच्या रुपात पाहिले. माला आईने कुठल्याच वाईट व्यसनाकडे जाऊ नये अशी शिकवण दिली. त्यामुळे मी आता आईच्या आशिर्वादाने माझे जीवन सुखी जगत आहे.