Home जालना माहोरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त

माहोरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त

256

आशाताई बच्छाव

1000363009.jpg

माहोरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त
महोरा प्रतिनिधी -मुरलीधर डहाके

याविषयी सविस्तर वृत्त असे की,
जाफराबाद येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. माहोरा येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. दुष्काळी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले असतांनाही बॅंकेच्या मॅनेजरच्या व कॅशियरच्या मनमानी कारभारामुळे तो वेळेवर शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या कामात येत नाही. शेतकऱ्यांनी विचारणा केली असता ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना नको ते कारण दाखवून खाली हाताने शेतकऱ्यांची बोळवण करण्यात येत आहे.उद्या या ,परवाला या आज साहेब नाही, बॅंकेत पैसे नाहीत असे बेजबाबदार वर्तन केले जात आहे.आशा प्रकारे शेतकऱ्यांना बॅंकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.हे उडवा-उडविचे उत्तर ऐकून शेतकऱ्यांना कंटाळा आला आहे. आमच्या प्रतिनिधींनी शाखाधिकारी कोठे आहे याविषयी विचारणा केली असता आम्हाला तुम्ही विचारणारे कोण,आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही अशा प्रकारे बेजबाबदारपणे उत्तर उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिले असल्याचे समजले आहे. असे किती फोटो काढणार आले आणि गेले आमचे कोणी काही करू शकत नाही तर शेतकरी राजा चिंतातुर झालेला आहे.शेतकऱ्यांना कोणी वाली नाही.यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल का ? आणि आपली बाजाराची थैली रिकामी घेऊन शेतकरी घरी परत जातात ही दयनीय अवस्था जाफराबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी खातेदारांवर आलेली आहे.दोन हजार रुपयासाठी जवळपास दहा ते पंधरा चक्रा शेतकऱ्याला माराव्या लागतात कामधंदा, बैल ,शेतीची मशागत सोडून सुद्धा त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडत आहे. 45 अंश तापमान असूनही सुद्धा बँकेत कुठे पाण्याची व्यवस्था नाही कुठे फॅन नाही आणि शेतकऱ्यांना दादागिरीच्या भाषेत बॅंकेचे कर्मचारी बोलतात. पैसे काढायचे असेल तर साहेबांना भेटा आणि वशिलेबाजी ने पैसे काढले जातात. अशीच परिस्थिती सुरू असल्यास एक दिवस शेतकरी हा संपल्याशिवाय राहणार नाही ,तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांची ही अडचण दूर करून बँकेवाल्यांची योग्य ते कान उघाडणी करुन अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

Previous articleदारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी
Next articleअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी पत्रकार स्वप्निल देशमुख.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.