Home बुलढाणा चिखलीतून पलायन केलेल्या दोघांना संभाजीनगरमधून घेतले ताब्यात, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई:...

चिखलीतून पलायन केलेल्या दोघांना संभाजीनगरमधून घेतले ताब्यात, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई: दोघांनाही दिले पोलिसांच्या ताब्यात…..

160

आशाताई बच्छाव

1000356699.jpg

चिखलीतून पलायन केलेल्या दोघांना संभाजीनगरमधून घेतले ताब्यात, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई: दोघांनाही दिले पोलिसांच्या ताब्यात…..

युवा मराठा न्यूज मोठा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर दोन महिन्यापूर्वी चिखलीतून एका अल्पवयीन मुलीसह पलायन करणाऱ्यास अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर मधून गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात घेतले आहे. दरम्यान सध्या पीडित अल्वयीन मुलीसह आरोपीस चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिसांच्या अभिलेखावर पीडित अल्पवयीन बालक, बालिकांचे अपहरण संदर्भाने दाखल असलेल्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामधील गुन्ह्यांच्या समांतर तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास आदेशित केले होते. त्यानुषंगाने चिखली येथील चालू वर्षातील एका प्रकरणातील पीडिता व आरोपी सोहम रतन आव्हाड (रा. सिद्धार्थ नगर, चिखली) यास ताब्यात घेण्यात आले आहे. प्रारंभी पुण्यातील भोसरी येथे तेअसल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे तेथे चौकशी केली असता संबंधित दोघे हे छत्रपती संभाजीनगर येथे आल्याचे समजले होते. त्यानुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रकरणात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असल्याने पीडिता व आरोपीस चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 7 मे रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने ही कारवाई केली.