Home अमरावती मेळघाटातील ११० दुर्गम गावामध्ये एकदाही लाल परी एसटी ची घंटी वाजली नाही.

मेळघाटातील ११० दुर्गम गावामध्ये एकदाही लाल परी एसटी ची घंटी वाजली नाही.

149

आशाताई बच्छाव

1000356448.jpg

मेळघाटातील ११० दुर्गम गावामध्ये एकदाही लाल परी एसटी ची घंटी वाजली नाही.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मेळघाटवासी यांनी जिल्ह्यात सर्वाधिक ७९.५५ टक्के मतदान केले. येथील विकासाच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. मात्र मेळघाटवासीयांच्या नशिबी व्याग्र प्रकल्पासह कठोर वन कायद्यामुळे अनेक सुविधा लाभ नाही. मजबूत रस्ते, नेट कनेक्ट, मजबूत रस्ते विज नसल्याने मेळघाटातील ११० दुर्गम गावापर्यंत अद्यापही एसटी बसचे दर्शन घडले नाही. परिणामी येथील आदिवासींना जंगली पदाचारांना श्वापदाचा धोका पत्करून वेळ व पैसा खर्च करून कधी बाईक,कधी सायकलने ,कधी खाजगी बसणे ,वाहनाने ५ते१० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या बस स्थानकापर्यंत प्रवास करावा लागत आहे. दुर्गम भागात रस्ते तयार करण्यासाठी वन विभागाची परवानगी द्यावी लागते. कारण, हा भाग व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येतो. वन्य प्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्यामुळे रस्ते कामासाठी परवानागी मिळत नाही. हे कीचकट व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. पाहाळ ,डोंगर,दय्रा,
नदी नाले जंगल भाग इथे असल्यामुळे मजबूत रस्ते नसतील, तर धोकादायक रस्त्यावर एसटी ही रस्त्यावर धाऊ शकत नाही. यासाठी किमान चांगले रस्ते पुल, सुरक्षित वाढले असणे आवश्यक आहे. एस टी द्वारे अंतर्गत भागात सर्वेक्षण केल्यानंतर १०० पेक्षा अधिक दुर्गम गावापर्यंत जाण्यासाठी रस्त्यात नसून ,तेथे लहान वाहन कसे तरी पोहोचू शकते, अशी स्थिती असल्याचे एसटी निरीक्षकांना आढळले. त्यामुळे या गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू करता आली नसल्याचे एसटी विभाग नियंत्रण कार्यालयाद्वारे सांगण्यात आले. दळणवळणाच्या सुविधा अभावी ,मेळघाटातील अनेक गावात ना एसटी बस ना, मोबाईल कनेक्ट ,टीव्ही ,नाही जशी येथील दुर्गम भागातील गावांची स्थिती आहे. मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्यापर्यंत एसटीची सेवा आहे. या मार्गावर जी गावे आहेत तिथवर एसटीची सेवा आहे. परंतु मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर आत तसेच १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावापर्यंत रस्तेच नसल्याने तेथे एसटी पोचू शकत नाही तेथील नागरिक सायकल किंवा इतर वाहनांनी बस थांब्यापर्यंत येतात. मेळघाटात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा हवा तसा फायदा नाही. कारण मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह वन कायद्यामुळे येथील रस्त्याचे स्वरूप बदलणे शक्य नाही. त्यासाठी परवानगीची मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदचे हात बांधले आहेत. येथील रस्ते आधीपासूनच माती, मुरूम, खडीचे असतील तर ते बदलता येत नाहीत. त्यामुळे खरी अडचण असून रस्त्या अभावी एसटी दुर्गम भागात पोहोचत नाही. सर्वेक्षण केल्यानंतर मेळघाटातील अंतर्गत भागात रस्ते वळण चांगले नसल्याचे आढळले. तिथून चार चाकी व्यवस्थित जात नाही. गावे फारच हात अशा रस्त्याने एसटीची वाहतूक करणे शक्य नाही. काही आहे तिथपर्यंत एसटी घेऊन जाणे कठीण असल्यामुळे तेथे एसटी बस जात नाही. प्रवीण काळमेघ वाहतूक निरक्षक एस टी महामंडळ अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधी माहिती दिली.

Previous articleएअर इंडियाचे 25 कर्मचारी बंडतर्फ,
Next articleअमरावती मतमोजणीच्या प्रारंभ पर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट सध्या: स्थितीत ५०४३ प्राप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.