Home बीड बीड जिल्ह्यातील ६२२ मतदारांनी पोस्टल मतदान केले

बीड जिल्ह्यातील ६२२ मतदारांनी पोस्टल मतदान केले

124

आशाताई बच्छाव

1000350566.jpg

बीड जिल्ह्यातील ६२२ मतदारांनी पोस्टल मतदान केले

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड  लोकसभा मतदारसंघात इतर जिल्ह्यांचे मतदार जे निवडणुकीच्या कामासाठी या जिल्ह्यात कार्यरत आहेत ज्यांचे मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहेत. तसेच या जिल्ह्याचे पोलीस अधिकारी , कर्मचारी तथा अन्य अधिकारी, कर्मचारी जे बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावर आहेत अशा एकूण ६२२ मतदारांनी आत्तापर्यंत पोस्टल मतदानाद्वारे मतदान केले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या दुसऱ्या प्रशिक्षण दिवशी प्रशिक्षणाच्या ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी पोस्टल मतदान करता येत आहे. त्यानुसार माजलगाव विधानसभा मतदारसंघात आज ११ आणि काल ०९ असे एकूण २० पोस्टल मतदान झालेले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात ३३० पोस्टल मतदान झाले आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघात १२१ पोस्टल मतदान झाले आहेत. केज विधानसभा मतदारसंघात १०६ पोस्टल मतदान झाले आहेत. तर परळी येथील विधानसभा मतदारसंघात ४५ असे एकूण ६२२ पोस्टल मतदान झालेली आहेत. अशी माहिती टपाली मतदान, सहाय्यक निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी कळवली आहे.