Home युवा मराठा विशेष देशात लोकसभा मतदारसंघाचा तिसरा टप्पा सुरू,

देशात लोकसभा मतदारसंघाचा तिसरा टप्पा सुरू,

257

आशाताई बच्छाव

1000350376.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : देशात लोकसभा मतदारसंघाचा तिसरा टप्पा सुरू, आज दिनांक7 मे 2024 या दिवशी भारतामध्ये संपूर्ण ठिकाणी लोकसभेचा मतदानाचा उत्सव पहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये काटेवाडी या ठिकाणी बारामतीचे उमेदवार सुनेत्रा ताई पवार त्याचबरोबर अजित पवार, सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर त्यांचे मुलगी रेवती सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडी मध्ये शरद पवार यांनी देखील हक्क बजावला. भारतामध्ये माननीय नरेंद्र मोदी, अमित शहा याने देखील मतदानाचा हक्क बजावला.रत्नागिरी मध्ये उदय सामान, रायगड मध्ये सुनील तटकरे,सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे, लातूरच्या बाबळगाव रितेश जेनेलिया साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले इत्यादी दिग्गजांनी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा हक्क बजावला आहे. हा लोकशाहीचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये उत्साहात साजरा होत आहे सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं व आपलं भरभरून मतदान करावं असं आव्हान या दिग्गजांनी केला आहे. दौंड मध्ये मळद या ठिकाणी काही वेळासाठी मशीन बंद पडली होती परंतु ती त्या ठिकाणी सुरळीत करण्याचे प्रयत्न केले गेले.एकंदरीत काय तर सकाळ सकाळ या उत्सवात अनेक नागरिकांनी सहभाग दर्शवला व आपला मतदान हक्क बजावला.