Home उतर महाराष्ट्र आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

246

आशाताई बच्छाव

1000350335.jpg

आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

सोनई/नेवासा , कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी – आदर्श विद्या मंदिर विद्यालयात १९९८ साली इयत्ता दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिशिंगणापूर येथे उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब आरगडे यांच्या हस्ते झाले.

मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळसकर अध्यक्षस्थानी होते. माजी विद्यार्थी अॅड. सुनील गडाख

शनिशिंगणापूर स्नेहमेळाव्यात उपस्थित माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक,

यांनी आयोजन विषयी माहिती दिली. आर. आर. शेंडे, संजय कल्हापुरे, ईश्वर देशमुख, पोपट खरचंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. २६ वर्षांनंतर एकत्र आलेल्या सवंगड्यानो आपली ओळख करून दिली. शालेय
जीवनातील आठवणीला उजाळा मिळाल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने खुलले होते. माजी विद्यार्थी महावीर चोपडा, देविदास शेटे, जालिंदर मुंगसे, वृद्धेश्वर गडाख, कृष्णा सुद्रिक, कानिफनाथ येळवंडे, अनिल घावंटे, सचिन शेटे, उषा दरंदले, मनीषा निमसे, सुषमा कोल्हे, वैभव शहा, अमित पालवे आदी उपस्थित होते. अॅड. गडाख यांनी सूत्रसंचालन केले. देविदास शेटे यांनी आभार मानले.

Previous articleनांदेड गोळीबाराने पुन्हा हादरले
Next articleबारदान गोदामाला लागलेल्या आगीमुळे नाशिकरोड परिसरात ९ दुकानांना झळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.