Home नांदेड नांदेड गोळीबाराने पुन्हा हादरले

नांदेड गोळीबाराने पुन्हा हादरले

224

आशाताई बच्छाव

1000350319.jpg

नांदेड गोळीबाराने पुन्हा हादरले.                             नांदेड, विशेष प्रतिनिधी शिवाजी धुमाळे 

अष्टविनायकनगर भागात गोळीबार करुन ४० हजारांची लूट निवृत्त बँक कर्मचारी रवींद्र रामराव जोशी वय ६८
गोळीबाराला न भिणारा बहाद्दर जेष्ठ नागरिक दरोडेखोरांना केला विरोध पण बहादुरी निष्पळ ठरली ४० हजार रुपये रोख रकमेची सूर्यप्रकाशात लूट

नांदेड,(प्रतिनिधी)-भावसार चौकपासून जवळच असलेल्या अष्टविनायक नगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या चोरट्यांना त्यांनी विरोध केल्यानंतर चोरट्यांनी तीन गोळ्या झाडून ४० हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस फाटा पोहोचला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
अष्टविनायक नगर भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक रवींद्र जोशी वय ६८ वर्ष हे सायंकाळी चार वाजता बँकेतून ४० हजार रुपये घेऊन आपल्या घरी आले, असताना ते गेटमध्ये आत जातांना दुचाकी वर आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जोशी यांनी एका दरोडेखोराला पकडून खाली पाडले.पण आपला विरोध होताना पाहून दरोडेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याची माहिती सांगण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा कैद झाली आहे. मोठा पोलीस फौज फाटा अष्टविनायक नगर मध्ये पोहोचला असून विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अंदाज असा व्यक्त होत आहे की रवींद्र जोशी यांनी बँकेतून पैसे काढतांना दरोडेखोरांनी पाहिले आणि त्यांचा पाठलाग करत ते त्यांच्या घरापर्यंत आले वय जास्त असलेला माणूस आहे आपण त्याला ताब्यात घेऊन लूट करू हा दरोडेखोरांचा भाव रवींद्र जोशींनी धुळीस मिळवताना एका दरोडेखोराला खाली पाडले. बहाद्दर अशा या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांशी दिलेली झुंज इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल

Previous articleहत्तीच्या हल्ल्यात मृतकाच्या परिवाराला युवा नेता संदीपभाऊ कोरेत यांनी दिली सांत्वना भेट
Next articleआदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.