आशाताई बच्छाव
सहाय्यक पोलीस अधिष्ठांचा वाळू माफीयांना दणका.
-अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर कारवाईचा बडगा.
देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )
देगलूर वार्ताहर– सध्या शहरात अवैध वाळू वाहतुकीने हैदोस घातला आहे ही बाब हेरून सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या आदेशान्वये त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी शनिवार दि 4 मे रोजी रात्री आठच्या दरम्यान येथील मान्य विकास विद्यालयासमोरून कर्नाटकात जाणाऱ्या तीन गाड्या जप्त करण्यात आले आहेत .
तालुक्यातील शेवाळा व तमलुर येथील शासकीय डेपोतून ऑनलाइन केलेल्या लाभार्थ्यांना वाळू पुरवठा केला जात आहे मात्र ऑनलाइन च्या नावाखाली झिरो गाड्या अर्थात रॉयल्टी ची कोणतीही पावती नसलेल्या व ओव्हरलोड गाड्यांचा हैदोस सध्या शहरातील मुख्य मार्गाने कर्नाटकात जात आहेत अशी अवैध वाळू पर प्रांतात जात असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वाळू मिळणे दुरा स्पष्ट झाले आहे याची ओरड लाभार्थ्यांमधून होत असतानाही महसूल व पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे हे बाब सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यापर्यंत पोहोचताच तात्काळ त्यांनी त्यांच्या पथकातील व्ही के महाराज व शिवा मुखेडकर यांना पाठवून या गाड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने उपरोक्त दोन्ही कर्मचाऱ्यांनी झिरो तथा ओव्हरलोड गाड्या अडून त्यांची तपासणी केली असता त्या अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले त्या अनुषंगाने तीन ओव्हरलोड गाड्या जप्त करून पुढील कारवाईसाठी महसूल प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.






