Home अमरावती कौटुंबिक शुल्लक वादातून खडकाडीपुरा अमरावती येथे तरुणाची हत्या: आरोपी फरार; हत्यारी नातेवाईकच.

कौटुंबिक शुल्लक वादातून खडकाडीपुरा अमरावती येथे तरुणाची हत्या: आरोपी फरार; हत्यारी नातेवाईकच.

110

आशाताई बच्छाव

1000341864.jpg

कौटुंबिक शुल्लक वादातून खडकाडीपुरा अमरावती येथे तरुणाची हत्या: आरोपी फरार; हत्यारी नातेवाईकच.
_______

दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय प्रतिनिधी.
अमरावती
शुल्लकारणावरून उद्भवलेल्या कौटुंबिक वादात एका तरुणाची चाकूने हल्ला चढवून हत्या करण्यात आली. ही घटना आज गुरुवारी दोन मे रोजी कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत खडकाडीपुरा येथे घडली. मारेकरी पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. प्रतीक प्रवीण जोशी वय २८रा.खरकाडीपुरा अमरावती असे मृतका चे नाव असून सुमित जोशी वय २६रा.खरकाडीपुराअमरावती असे पसार झालेल्या मारेकार्‍यांचे नाव आहे. प्रतीक जोशी व सुमित जोशी हे दोघे नातेवाईक असून गुरुवारी सायंकाळी त्यांच्यात कुठल्यातरी शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादा त सुमित जोशी ने प्रतीक वर चाकुहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रतीक जोशी हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर सुमित जोशीने तेथून पळ काढला. दरम्यान, नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी प्रतीक जोशीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णाला दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यानच्या काळात खोल्हापुरी गेट अमरावती पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलीस पसार झालेला आरोपी सुमित जोशीचा कसून शोध घेत आहे.

Previous articleधक्कादायक!    जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोघांना जिवंत जाळणाऱ्या 15 आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केले अटक
Next articleहरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते महेंद्र काळे (पत्रकार)यांचा सत्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.