आशाताई बच्छाव
सुरज कोडापे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ….आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन!! …
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नंबर दोन येथील सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामीण भागात राहणारे सुरज कोडापे. यांनी आपल्या मेहनती व चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याने त्यांची महाराष्ट्र शासनाच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे अभिनंदन केले.
सुरज कोडापे हा सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने वडिलांच्या संस्काराचा वारसा घेऊन त्याने ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वाटचाल केली.आणि महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून “परिश्रमाशिवाय यश मिळत नाही” या युक्तीप्रमाणे त्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले. आणि हे यश संपादन केले.त्यांने आपले शिक्षण PG Journalism मध्ये केल्याने काही दिवस पत्रकार म्हणून सुद्धा काम केलेले आहे. तेव्हा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित प्रामुख्याने परिवारातील सदस्यांसह ,जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, रोशनजी कुमरे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रतीक राठी, युवा नेता सोनू कुमरे, सौरव गौरकार, कृष्णा नैताम, संतोष चिचघरे आदी उपस्थित होते.