Home सामाजिक श्रीराम जन्म सोहळा म्हणजे रामनवमी

श्रीराम जन्म सोहळा म्हणजे रामनवमी

95

आशाताई बच्छाव

1000293500.jpg

श्रीराम जन्म सोहळा म्हणजे रामनवमी

श्रीराम चरीत्र हे आदर्श पुरुषांचे चरीत्र आहे. श्रीराम जो आदर्श ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगिकार करावा हा श्री रामनवमी साजरी करण्याचा उद्देश आहे.
रामनवमी हा उत्सव धुमधडाक्याने साजरा होतो. कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक , सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहुन पुरुष कसा उत्तम होऊ शकतो. हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे जीवन चरीत्रावरुन आपल्या समजते. एकवचनी, एक पत्नी ,एक वाणी, एक बाणीही होते. त्याच्या निश्चय आणि त्यागी होता. वनवासात जाण्यास सिध्द होणारा राम केवढा पितृ भक्त, त्यागी होता. वडीलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्यातील त्याग करून १४ वर्ष वनवास पत्करणारा राम केवढा निश्चयी धैर्याचा महामेरू होता. श्रीरामांचे कौटुंबिक आदर्श हे उच्चनीय आहे. त्याचा स्वार्थ त्याग पराकोटीचा आहे. त्यामुळे क्लेश, भांडणे, झगडे शेकडो मैल दूर राहतात. माणसांचे हृदय परीवर्तन होते मातृ पितृ प्रेम अवर्णनीय आहे. थोडे तरी अनुकरण आजच्या नव्या पिढीने केले पाहिजे. या देशात रामराज्य निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही. लोभ नव्हता, रावणाला मारल्या नंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतः कडे न ठेवता बिभीषणाला देऊन टाकले. हल्ला मारून सुग्रीवाला राजा केले कधीही मोह धरला नाही मित्र प्रेम गुरू प्रेम भक्त प्रेम मातृपितृप्रेम, पत्नी प्रेम, देशप्रेम, प्रजा प्रेम हे सर्वच गुण श्रीराम हे प्रजापालक, केवलादेव निष्काम प्रेम उर्मिलेचा विश्वास लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग भारताचा आदर्श आणि हनुमंताचे सर्वस्व आहे. दुपारी १२ वाजता रामरक्षा म्हणून पाळणा म्हणून श्रीराम जन्म राम नवरात्र महोत्सव करतात. चैत्र पाडवा पासून रामनवमी दिवसापर्यंत
उत्सव साजरा केला जातो. श्रीराम स्मरण होऊन त्यांची
जनमानसावर बिंबली जाते.भारतभूमी धन्य आहे.प्रभु रामचंद्र महाराज अयोध्यापती रामचंद्र की जय..

सौ अर्चनाताई जामोदे
खामगाव (बुलढाणा)

Previous articleपरळी तालुक्यातील धर्मापुरी जवळ भीषण अपघात; दोन मजुरांचा जागीच मृत्यू
Next articleवनसगाव येथील वाघ कुटुंबातील बहिण -भाऊ पोलीस उपनिरीक्षक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.