Home नाशिक नाशिक जिल्ह्यात इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम !

नाशिक जिल्ह्यात इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम !

160

आशाताई बच्छाव

1000200620.jpg

.

पाठ्यपुस्तके दान करण्यासाठीचे आवाहन –

नाशिक जिल्ह्यात इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम !

नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ):- जिल्ह्यातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने मोफत शालेय पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ह्या उपक्रमात गरीब गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा एक हेतू आहे. ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ संपलेल्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय पाठ्यपुस्तके आमच्याकडे मोफत जमा करून ज्ञानदानाचे अनमोल कार्य करावे व नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शैक्षणिक संस्थांना , फाऊंडेशनना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे व विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यासाठी मदत करावी असे आवाहन स़ंस्था अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत व सचिव आशाताई बच्छाव यांनी केले आहे. सध्याची वाढती महागाई बघता सध्याच्या शैक्षणिक खर्च हा त्या गरीब गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना असाह्य आहे व शालेय गणवेश, वह्या , मार्गदर्शक तसेच नवनीत व्यवसाय ह्या सर्व गोष्टी प्रत्येकी १०००/- रूपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटलीसाठी हातभार लावण्याचे आवाहन नाशिककरांना करण्यात आले आहे. आणि हीच खरी आदरांजली महाराष्ट्राचे आराध्यदैवत व स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिक्षणाचे महामेरू परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना राहील. असे राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.
पत्ता :- आश्रयआशा फाऊंडेशन कार्यालय मु.व-हाणे पो.सोनज ता.मालेगाव जि.नाशिक
संपर्क क्रमांक:- ९८५०४४७६८५/९६८९५१९०९४ किंवा इमेल आयडी:- yuvamarathanews2003@gmail.com

व ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीचे पाठ्यपुस्तकांची आवश्यकता आहे त्यांनीही आपली नावनोंदणी करावी. आमच्याकडे पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर आम्ही ते विद्यार्थ्यांना देऊ. असे आश्वासन दिले आहे.

Previous articleयुवा मराठाचे दावल पगारे यांना पितृशोक
Next articleजळगाव एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनी मध्ये स्फोट . आगीचे रौद्र रूप धारण ….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.