Home नाशिक भजन सेवा लासलगाव’ या युट्युब चॅनलला सिल्वर प्ले बटन

भजन सेवा लासलगाव’ या युट्युब चॅनलला सिल्वर प्ले बटन

173

आशाताई बच्छाव

1000287805.jpg

‘भजन सेवा लासलगाव’ या युट्युब चॅनलला सिल्वर प्ले बटन

संचालक/ निर्माता शिवाजी विसपुते यांनी मानले सर्वांचे आभार

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

लासलगाव येथील रहिवासी असलेले शिवाजी विसपुते हे बऱ्याच वर्षांपासून लासलगाव परिसरातील विविध ठिकाणी होणारे धार्मिक सत्संग, प्रवचन, कीर्तन, शिवमहापुराण कथा तसेच श्रीमद् भागवत कथा यांचे चित्रीकरण करुन ते आपल्या ‘भजन सेवा लासलगाव’ या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलवर अपलोड करत असतात.
त्यांचे आराध्य परमपूज्य भगरी बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्या चॅनलचे नुकतेच एक लाख सबस्क्राइबर्स पूर्ण झाले असुन नुकतेच त्यांना युट्युब या कंपनी कडुन अमेरिका येथून सिल्वर प्ले बटन कुरिअरद्वारे प्राप्त झाले.
राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी यांचे कृपाप्राप्त शिष्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते त्यांनी या ‘सिल्वर प्ले बटन’ चे अनावरण केले.
संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या चॅनेलला पसंती असतेच त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरून व परदेशातून देखील काही मराठी प्रेक्षक त्यांच्या चॅनेलशी जोडले गेले आहेत.
सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना एक लाख सबस्क्राईबर पुर्ण करून हे प्ले बटन मिळवल्या बद्द्ल शुभेच्छा त्यांचे देऊन कौतुक केले. याप्रसंगी त्यांचे अनेक स्नेही जन उपस्थित होते.

Previous articleनांदुर्डी विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन—
Next articleरेणूका माता संस्थान माहोरा, येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.