Home नाशिक सोमपूरचा मटकाकिंग दाणी, कमावतो हरामाचा मालपाणी!

सोमपूरचा मटकाकिंग दाणी, कमावतो हरामाचा मालपाणी!

318

राजेंद्र पाटील राऊत

1000275949.jpg

मोसम खो-यात सट्टा मटकाचे थैमान,पोलिसांचे अर्थपूर्ण मौन
सोमपूरचा मटकाकिंग दाणी,
कमावतो हरामाचा मालपाणी!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव – सटाणा तालुक्यातील मोसम खो-यात असलेल्या सोमपूर गावात सट्टा मटका जुगाराचे थैमान वाढले असून, याप्रकरणी पोलिसांनी मात्र मौन धारण केले असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
सोमपूर हे गाव जायखेडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येत असून, अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात दाणी नामक सट्टा मटका माफिया राजरोसपणे जुगार चालवून गोरगरिबांचे संसार उध्वस्त करीत आहे.कमी पैश्यात जास्त पैसे मिळण्याच्या लालसेपोटी गोरगरीब आपली हक्काची कमाई या जुगारात बरबाद करीत आहेत.तर सट्टा मटका माफिया दाणी हा सर्वसामान्य नागरिकांना देखील जुमानत नसून,आपले कुणीच काही करु शकत नसल्याच्या बेताल वल्गना करीत असल्याच्या तक्रारीही सुज्ञ नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर युवा मराठाशी बोलताना केल्या (उद्या वाचा – शहाजी उमाप यांची पाठ फिरताच कळवणच्या जायबारीत रोजच होतेय अवैध सट्टा मटका धंद्याची लाखो रुपयांची उलाढाल)

Previous articleश्रीमती जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती
Next articleजालन्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.