Home नाशिक श्रीमती जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती

श्रीमती जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती

143

आशाताई बच्छाव

1000275924.jpg

श्रीमती जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

येत्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांचे मतदान करण्याचे प्रमाण वाढावे या उद्देशाने, शासन परिपत्रकानुसार श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे विविध उपक्रम घेण्यात आले रांगोळी , मेहंदी, वादविवाद ,निबंधलेखन, पत्रलेखन, स्वयंसेवक व मतदार दूत नेमणे, माता पालक मेळावा असे विविध उपक्रम घेण्यात आले. आठ एप्रिल रोजी मतदान जनजागृती रॅली संपूर्ण चांदवड शहरातून काढण्यात आली. त्यात चांदवड शहरातील प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारे विविध घोषवाक्यांनी मतदानाविषयी जागृती केली. त्यानंतर श्रीमती जे .आर .गुंजाळ विद्यालयाच्या प्रांगणात चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साबळे साहेब ,गटशिक्षणाधिकारी बोडके साहेब, विस्तार अधिकारी खैरनार साहेब, केंद्रप्रमुख ठोके सर, केंद्र मुख्याध्यापक महाले सर, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाके साहेब विद्यालयाचे प्राचार्य लोहकरे सर ,पर्यवेक्षक आहेर सर ,नगरपरिषदेचे सर्व अधिकारी -कर्मचारी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी साबळे साहेब यांनी मतदानाचे महत्त्व विषद
केले. त्यानंतर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक काळे सर यांनी सर्वांना मतदान जनजागृती प्रतिज्ञा दिली आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleतुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाचा २५ लाख भाविकांनी घेतला लाभ
Next articleसोमपूरचा मटकाकिंग दाणी, कमावतो हरामाचा मालपाणी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.