Home नांदेड बुधवारी 9 अर्ज ; आतापर्यंत 20 अर्ज दाखल 145 अर्जाची उचल ;...

बुधवारी 9 अर्ज ; आतापर्यंत 20 अर्ज दाखल 145 अर्जाची उचल ; गुरुवारी शेवटची तारीख

100

आशाताई बच्छाव

IMG_20240404_185359.jpg

बुधवारी 9 अर्ज ; आतापर्यंत 20 अर्ज दाखल
145 अर्जाची उचल ; गुरुवारी शेवटची तारीख
मराठवाडा विभागीय संपादक
मनोज बिरादार
नांदेड दि. 3 एप्रिल :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या गुरुवार चार एप्रिल शेवटचा दिवस आहे. आज बुधवारी एकूण 9 अर्ज दाखल झाले. 19 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

बुधवारी 16 नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे 19 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी एकोणवीस अर्जाची उचल करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 145 अर्ज उचलण्यात आले आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दाखल झालेले अर्ज लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष), तुकाराम गणपत बिराजदार (अपक्ष ), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी ), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत,), मोहम्मद वसीम (अपक्ष ), मोहम्मद सिद्दीकी शेख संदलजी (अपक्ष), भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष ), असलम इब्राहिम शेख (अपक्ष )

आतापर्यंत दाखल झालेले अर्ज चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी), विष्णू मारुती जाधव (राष्ट्रीय किसान पार्टी), जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष ), कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) ,नागोराव दिगंबर वाघमारे (अपक्ष ), नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन (अपक्ष), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष),अकबर अख्तर खॉन (अपक्ष),साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष), जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे. 28 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्याचा एक दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी 5 एप्रिलला होईल. अर्ज 8 एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. 8 तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.

Previous article_जागतिक विकासासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी, विकसित भारत बनविण्यासाठी आपले मत कमळालाचं देऊन विजयी करा_.. खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन..
Next articleजिल्हा रुग्णालयात जागतिक स्वमग्न दिन संपन्न .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.