Home नांदेड आगामी सण व उत्सव शांततेत पार पाडावे -डी वाय एस पी गोसावी.

आगामी सण व उत्सव शांततेत पार पाडावे -डी वाय एस पी गोसावी.

117

आशाताई बच्छाव

IMG_20240403_204003.jpg

आगामी सण व उत्सव शांततेत पार पाडावे -डी वाय एस पी गोसावी.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर ( वार्ताहर):- देगलूर शहर हे संताची भूमी म्हणून सर्वदूर ख्याती आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक जाती धर्माचे सण व उत्सवाला कोणतेही गालबोट न लावता शांततेत पार पाडावे असे आव्हान करीत जर कोणी कायद्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही असा सज्जड दम ही उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी दिली.
आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देगलूर पोलीस ठाण्याच्या वतीने ठाण्याच्या प्रांगणात मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी पोलीस निरीक्षक झुंजारे माजी नगरसेवक धोंडीबा कांबळे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील थडके,माजी नगर सेवक सूर्यकांत सोनकांबळे ,राजा कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चंद्रकांत ठाणेकर ,भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे माजी नगरसेवक सुशील देगलूरकर ,शिवसेनेचे संजय जोशी, एम.आय.एम चे तालुकाध्यक्ष झाकीरभाई यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. आणि याच दरम्यान मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद , महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यासह गुढीपाडवा असे सण व उत्सव येत आहेत त्या अनुषंगाने कोणत्याही जाती धर्मात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये तसेच यादरम्यान डीजे वाजवण्यास मनाई आहे .त्यामुळे पारंपारिक वाद्य वाजवत आगामी सण व उत्सव शांततेत पार पाडावे असे आव्हान डीवायएसपी संकेत गोसावी यांनी केले आहे. यावेळी शहर व परिसरातील शांतता कमिटीच्या सर्व प्रमुख सदस्यासह अन्य प्रतिष्ठित व सुजान नागरिकांची उपस्थिती होती.

Previous articleपरळी औष्णिक विद्युत केंद्र संच क्र.९ चे काम सुरू करण्यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समितीचे निवेदन
Next articleजिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्ष पदी चैतन्या वानखेडे यांची निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.