आशाताई बच्छाव
स्वा शे संघटनेचे मा खा राजू शेट्टी साहेब यांची घेतली नऊ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक—
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिंडोरी लोकसभा उमेदवारीसाठी आज दिंडोरी लोकसभेतील नऊ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मा.खा.राजु शेट्टी साहेब यांच्या निवास्थानी भेट घेऊन शेतकर्यांचा लोकप्रतिनिधी सभागृह पाठवायचा आहे अशी मागणी गोरठाण येथील ग्रामस्थ,शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेकदा कांदा प्रश्न असू द्या ,द्राक्षाचा प्रश्न असू द्या, उसाचा असू द्या आणि सरकारच्या विरोधी धोरणावरती आंदोलने मोर्चे केलेले आहेत आणि शेतकरी प्रश्नावर ती काम करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना निस्वार्थपणे शेतकऱ्यांसाठी झटत असते. त्यानंतर जिल्हा बँकेचा ही सक्तीची वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दंड थोपाटले होते. मायक्रो फायनान्स व इतर बँकांच्या वसुली संदर्भात स्वामिनी शेतकरी संघटना कायम आग्रही राहिलेले आहे. राजू शेट्टी साहेब सदैव शेतकऱ्यांच्या पाठीवरती हा ठेवून उभे आहेत. त्याचबरोबर या त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात ऊस परिषद शेतकरी मेळावे घेऊन शेतकरी संघटित करण्यासाठी साहेब कायम अग्रेसीव असतात. दिंडोरी मतदार संघात सौ.मालतीताई राहुल ढोमसे यांची उमेदवारी व मताधिकाराचे गणिते कशी जुळतात हे प्रविण घुमरे यांनी सांगीतले व राहुल ढोमसे यांचे सामाजिक चळवळीतील काम भविष्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भुमिकेप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमिका राहील असे मा.सरपंच रामेश्वर ढोमसे यांनी राजु शेट्टी साहेब यांच्याशी बोलताना सांगीतले व दिंडोरी लोकसभेला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली या प्रसंगी माननीय राजू शेट्टी साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक लढा द्यायचा आहे व शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे असे सर्वांना सांगण्यात आले व दिंडोरी जागेसाठी सकारात्मक चर्चा झाली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे,राम राजोळे,संजय जाधव ,गजानन घोटेकर,आत्माराम पगार ,कृष्णा घुमरे, तसेच जिल्ह्यातील शेतकरी नारायण ढोमसे,रामेश्वर ढोमसे,प्रवीण घुमरे,योगेश हांडे,अमोल ढोमसे,विजयसिंग ढोमसे,गोविंद ढोमसे,निलेश ढोमसे, इ.शेतकर्यांनी मा.खा.राजु शेट्टी साहेब यांच्याशी चर्चा केली व सकारात्मक चर्चा केली.