आशाताई बच्छाव
💐💐मी.. कविता 💐💐. चांदूरबाजार जि.अमरावती येथील तहसिलदार गीतांजली मुळीक गरड यांनी लिहिलेली हि कविता प्रसारीत करीत आहेत.-व्यवस्थापकीय संपादक
तू लिहिलेस हळुवार तुझ्या
हातानी हलकेच कुरवाळून
अलवार पापणीवर,सजवून
अलंकार नि वर्ण लेवून..
तू वाचलेस निःशब्द मनातले
अन डोळ्यातले भाव जपून
मग साकारून मलाच दिलीस भेट
तिजसाठी देहभान हरपून!
तो लाभला शिपाई सैनिक सेवक
साऱ्या जगाशी उरला पुरुनी
जी करतो सेवा जगी अन सदनी
त्यालाही गुम्फावे माझ्यात लेवूनी!
तू जगलास विरहात पचवून विखार
घेऊन निरोप प्रेमाचा तुझ्या
पण हात धरून तुझाच,गिरवून
वेदनांचा उमाळा घेते हातात माझ्या!
तू बोलें बडबड गीत सहज
ना आकार त्यास ना उकारही देई
तुझ्या निरागस शब्दांना मग
मीच उभारून गोड हुंकार देई
आईपण मग बाईपण मग स्त्रित्वाचा उदोउदो
करून दाखवे, लिहून दाखवे
घडवून दाखवे ही ललना
तिच्या हातास धरून मीही
मग तिच्याच मागे पाऊल उमटवून
वाट पाहते म्हणेल ती मज तुही माझ्या समवेत येना 💐💐💐
…..मी एक कविता..
... गीतांजली मुळीक – गरड,
तहसीलदार, चांदुरबाजार