Home अमरावती रमजाननिमित्त साहित्याने सजली बाजारपेठ. बाजारपेठेत मिठाई, सुकामेवा, फळे, खजूर खरेदीसाठी होतंय गर्दी.

रमजाननिमित्त साहित्याने सजली बाजारपेठ. बाजारपेठेत मिठाई, सुकामेवा, फळे, खजूर खरेदीसाठी होतंय गर्दी.

108

आशाताई बच्छाव

IMG_20240316_171006.jpg

रमजाननिमित्त साहित्याने सजली बाजारपेठ. बाजारपेठेत मिठाई, सुकामेवा, फळे, खजूर खरेदीसाठी होतंय गर्दी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
मुस्लिम समाज बांधवांसाठी रमजानचा महिना सर्वात पवित्र मानला जातो. त्या अनुषंगाने यंदा या पवित्र रमजानचा महिना मंगळवार १२ मार्चपासून सुरू होणार आहे या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर रोजा अर्थात उपास ठेवतात. त्यानिमित्त बाजारात खजुरासह विविध साहित्य तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे खजुराचे विविध प्रकारही सध्या शहरात विविध बाजारपेठेत दाखल झाले आहे मुस्लिम बांधवांसाठी सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र समाजाला मानला जाणारा रमजान महिना सुरू होत आहे. त्यानिमित्त बाजारपेठेत मिठाई, सुकामेवा, फळे, खजूर याची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून रमजान ईद साजरी केली जाते. मुस्लिम बांधवाकडून महिनाभर केलेला उपवास, रोजा इतक्या दिवशी सुटत असतो. मुस्लिम बांधवाकडून मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. लहानपणापासून ती मोठ्यापर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. इतक्या दिवशी शीरखुर्मा वाट पाहणे रोजाचा समारोप केला जातो. त्यासाठी मुस्लिम बांधवाकडून नवीन कपडे शीरखुर्मा साठी लागणारे पदार्थ तसेच अन्य विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेषता कपड्याच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते शहरातील अजितवारा बाजार, पठाण चौक, मोची गल्ली, हबीब नगर, ट्रान्सपोर्ट नगर या ठिकाणी रमजान करता लागणारे साहित्य विक्री उपलब्ध आहे रमजान मध्ये जशी खजूर याला जास्त मागणी असते तसेच खाद्यपदार्थ शिवाय अत्तर, टोपी, सुरमा तसेच विभाजक म्हणजेच प्रार्थनेसाठी लागणारी विद्यादेखील जास्त मागणी असते याची देखील जास्त मागणी असते याची देखील दुकाने फाटलेली पाहायला मिळत आहे. तसेच मशिदीत देखील स्वच्छता आणि साफसफाई आणि सजावटीला सुरुवात झाली आहे. बाजारात विविध प्रकारचे खजुरी दाखल झाले असून बाजारात अजवा, मुजरब, कलमी, मदिना, मगजोल, फरत, सुलतान, सगाई, अंबर, केमिया, मरूकसार, हसना, मुरारी असे विविध खजूर दाखल झाले आहे. तसेच यंदा बाजार भाव किती किलो मागे ३०ते४० रुपयाची वाढ झालेली आहे. पाहिजे तेवढा खजूर यांना बाजारात आलेला नाही, अशी माहिती यावेळी खजूर विक्रेते अब्दुल शेख यांनी दिली आहे.

Previous articleअमरावती जुन्या शहरात पंचशील चौकात घाणीचे साम्राज्य.
Next articleबडनेरा व्हॅगन दुरुस्ती कार्यशाळेचे हस्ते आज उद्घाटन ११०० जणांना प्रत्यक्ष, तर५ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.