Home नांदेड व्हॉईस ऑफ मीडियाच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी सय्यद हबिब उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे व...

व्हॉईस ऑफ मीडियाच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी सय्यद हबिब उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे व कार्याध्यक्ष पदी माधव गोटमवाड

139

आशाताई बच्छाव

IMG_20240310_203112.jpg

व्हॉईस ऑफ मीडियाच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी सय्यद हबिब उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे व कार्याध्यक्ष पदी माधव गोटमवाड

मनोज बिरादार
मराठवाडा विभागीय संपादक

व्हॉईस ऑफ मीडियाच्या कंधार तालुका अध्यक्षपदी सय्यद हबिब सय्यद इसाक तर उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे यांची निवड करण्यात आली आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे कार्य सुरू आहेत. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया पुढाकार घेत असून नांदेड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, महानगर अध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांनी तालुका कार्यकारणी निवड कार्यक्रम आखला असून नुकतीच माहूर, बिलोली व्हॉईस ऑफ मीडिया तालुका कार्यकारणी निवडल्यानंतर कंधार येथील पत्रकारांची बैठक घेवून कंधारची व्हॉईस ऑफ मीडिया तालुका कार्यकारणी निवडण्यात आली.

यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी सय्यद हबिब सय्यद इसाक, उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे, सचिव पदी विनोद तोरणे, सहसचिव संतोष कांबळे, कार्याध्यक्ष माधव गोटमवाड, सदस्य ॲड.सिद्धार्थ वाघमारे, मगदूम परदेशी, जमील बेग, ॲड. उमर शेख, माधव जाधव पानशेवडीकर यांच्यासह आदी जणांची कार्यकारणी निवडण्यात आली आहे.

Previous articleगृहिणी
Next articleजिल्हा कचेरीवर उपोषण: १४ प्रकल्पग्रस्त आंदोलकांची प्रकृती बिघडली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.