Home उतर महाराष्ट्र माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

240

आशाताई बच्छाव

IMG_20240304_071733.jpg

माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

अहमदनगर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- माणसाच्या जगण्याशी सुसंगत कविता लिहिली तर ती अंतर्मनाला भिडते, असे साहित्य आता खूप कमी निर्माण होत असून कवी लेखकांनीही आपली आपले वाचन वाढवायला हवे,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित अहमदनगर ग्रंथोत्सव 2023 च्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ कवी प्रा.शशिकांत शिंदे,शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, लेखिका प्रा. मेधाताई काळे, प्रा.डॉ. मच्छिंद्र मालुंजकर व प्रभारी ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर हे होते.
पुढे बोलताना कवी चंद्रकांत पालवे म्हणाले की, माणसांचे जगणे सुसहाय्य करणारे साहित्य खरे साहित्य असते,त्यातील रचना, कथा,कविता मनाला भिडतात म्हणूनच ते साहित्य सर्वश्रेष्ठ साहित्य असते.नव्या पिढीने असे सुसंगत साहित्य निर्माण करायला हवे.
प्रा.शशिकांत शिंदे म्हणाले की, नव्याने लिहिणाऱ्या कवींना मार्गदर्शक ठरेल अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हायलाच हवे, मानव केंद्रित व माणुसकी जपणारे साहित्य निर्माण व्हायला हवे.
सुनील गोसावी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन ग्रंथोत्सवात आयोजित काव्यसंमेलनातील कवींच्या पाठीवर शासकीय थाप पडत असल्याचे नमूद केले.
यावेळी कवयित्री शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्यसंमेलनात एम.पी. दिवाण,दशरथ खोसे, सरोज आल्हाट,स्वाती ठुबे,सुजाता पुरी, वर्षा भोईटे, सुरेखा घोलप,शामा मंडलिक, अरविंद ब्राह्मणे,प्रमोद येवले, बबनराव गिरी यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. काव्यसंमेलनास सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू पाटील,भाऊसाहेब सावंत, तारकराम झावरे,संभाजी वाळके, जगन्नाथ गोसावी, गणेश भगत,रवींद्र सातपुते,नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे,नवगिरे गुरुजी, कैलास बुधवंत, सय्यद सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी करून शेवटी आभार मानले. जिल्हाभरातून आलेले वाचनालयाचे पदाधिकारी, साहित्यिक व साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शुभारंभ
Next articleशारदा फाउंडेशनचा 6 वा वार्षिक दिवस 2023-24 कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.