Home उतर महाराष्ट्र डॉ.संदिप तांबे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार

डॉ.संदिप तांबे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार

96

आशाताई बच्छाव

IMG_20240303_084806.jpg

डॉ.संदिप तांबे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार
सोनई अहमदनगर कारभारी गव्हाणे– मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय,सोनई याठिकाणी कार्यरत असलेले विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ.संदिप कडूभाऊ तांबे यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था,टाकळीभान यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदिप सांगळे,जेष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये,डॉ.शिरीष लांडगे,डॉ.वसंत शेंडगे,डॉ.शरद दुधाट यांच्या शुभहस्ते देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत डॉ.संदिप तांबे यांनी ‘ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयातील स्त्रीदर्शन’ या विषयावर पीएच.डी केली आहे. त्यांच्या या संशोधन कार्याची दखल घेऊन हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना देण्यात आला.नेवाशामध्ये संत ज्ञानेश्वरांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयावर पीएच.डी मिळवणारे ते पहिलेच प्राध्यापक असून ते विद्यार्थीप्रिय तसेच उपक्रमशील प्राध्यापक आहेत असे भेंडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे म्हणाले.या पुरस्काराबद्दल डॉ.संदिप तांबे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleसंग्रामपूर तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा लहरीपणा; अनेक पिकांच नुकसान शेतकरी संकटात!.
Next articleवाघाच्या दातानं आणलं.. आ.गायकवाडांना अडचणीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.