Home जालना बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू –

बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू –

110

आशाताई बच्छाव

IMG_20240221_083032.jpg

बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू –
उमेद्च्या वतीने जानकी वस्तूचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी
  ना. खा. केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे प्रतिपादन
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)दि २०, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद च्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य  केले  जाईल ,जेणे करून  ग्रामीण भागातील महिला सक्षम होण्यास मदत होईल  असे प्रतिपादन  जिल्हा स्तरीय जानकी वस्तू व प्रदर्शनाचे  उद्घाटन प्रसंगी  केंद्रीय राज्य मंत्री खा मा.ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी केले .जानकी सरस महोत्सवाचे त्यांचे  हस्ते संपन्न झाले.
यावेळी मंचावर माजी आमदार अरविंदराव चव्हाण ,जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, भास्कर आबा दानवे, बद्रीनाथ पठाडे,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मिर्झा अन्वर बेग,रामेश्वर भांदरगे , प्रकल्प संचालक शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा लक्षात घेवून , महिला बचत गटांनी मालाचे उत्पादन केल्यास , गटांना आर्थिक स्वावलंबन होण्यास मदत होईल. देशाचे पंतप्रधान यांनी या महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लखपती दीदी  या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हयातील जास्तीत महिलांनी याचा लाभ घेवून गावात आपली वेगळी ओळख निर्माण करावी , जिल्ह्यात आज ११ महिलांच्या शेती उत्पादक कंपन्या असून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १६२ कोटी रुपयाचे वाटप केले असून त्या उमेद अंतर्गत आगामी कालावधीत विविध प्रकारचे कामे, प्रशिक्षणे आयोजित करण्या बाबत सूचना  ही खा. दानवे पाटील यांनी यावेळी केल्या.

Previous articleतारूण्याच्या उंबरठ्यावरील प्रेम  **************************
Next articleलक्षवेधी महारक्तदान शिबिराने  जालन्यात शिवरायांना अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.