Home अमरावती शिव केसरी 2024 कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी.

शिव केसरी 2024 कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी.

111

आशाताई बच्छाव

IMG_20240220_161742.jpg

शिव केसरी 2024 कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी.
———-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
नमो युवक क्रीडा संस्था च्या वतीने व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीच्या सहयोगाने भव्य विदर्भ स्तरीय व राज्यस्तरीय पुरुष व महिला शिव केसरी कुस्ती स्पर्धा दिनांक 23 ते 25 फेब्रुवारी 2024 रोजी नेहरू मैदान,राजकमल चौक, अमरावती येथे आयोजित केलेली आहे..
कुस्ती स्पर्धेत लाखो रुपयांची रोख बक्षिसे व चांदीची गदा महिला व पुरुष केसरी गटात देण्यात येणार आहे..डॉ संजय तिरथकर व डॉ रणवीर सिंग राहल यांच्या मार्गदर्शना मधे स्पर्धा होणार असून व स्पर्धेत भाग घेण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हर्षद सदगीर, पोपट घोडके, सहभाग नोंदवणार आहे. शिवजयंती च्या पर्वावर या स्पर्धा होत असून या स्पर्धेचा उद्देश नवीन पिढीला बलशाली व व्यायामची आवड निर्माण करण्या करिता या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आयोजक पैलवान करण डेंडवाल व मित्रपरिवार अथक परिश्रम घेत आहे व स्पर्धेची तयारी युद्ध स्तरावर सुरू आहे…