Home अमरावती केंद्र अधिकाऱ्यांच्या आज मोठ्या धोरणाचा परिणाम: विद्यार्थी सीबीएसई परीक्षेपासून वंचित; पालकांचा आरोप,...

केंद्र अधिकाऱ्यांच्या आज मोठ्या धोरणाचा परिणाम: विद्यार्थी सीबीएसई परीक्षेपासून वंचित; पालकांचा आरोप, तक्रार करणार.

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_162102.jpg

केंद्र अधिकाऱ्यांच्या आज मोठ्या धोरणाचा परिणाम: विद्यार्थी सीबीएसई परीक्षेपासून वंचित; पालकांचा आरोप, तक्रार करणार.
————
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथील स्कूल आप स्काॅलर्स(एस ओएस)या परीक्षा केंद्राचे केंद्र अधिकारी यांनी घेतलेल्या आडमुठ्या धोरणामुळेआज, सोमवारी एक विद्यार्थी सीबीएस इच्या दहावीच्या परीक्षेपासून वंचित राहिला. जीवनाला कलाटणी देणाऱ्या या परीक्षेतील एका विषयाचा पेपर न देऊ शकल्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे अख्खे वर्ष वाया गेले असून आता त्याला पुढील वर्षीच या विषयाची परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान हा सारा प्रकार त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी यांच्या असून सदर विद्यार्थ्यांला परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासोबतच त्याला दिलासा मिळवून देण्याची मागणी केली आहे. दसरा मैदानातील कलर्स कॉन्व्हेंट या सीबीएसई शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रेम वानखडे याला शीतला कॉलेज-गोपाल नगर रस्त्यावरील शाळा परीक्षा केंद्र म्हणून नेमून देण्यात आली आहे. सदर केंद्रावर आज, सोमवारी संस्कृत विषयाचा पेपर होता. पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होणार होता. प्रेम वानखडे हा त्या वेळेच्या दहा मिनिट अवधी सदर केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. मात्र तत्पूर्वी केदार बंद करण्यात आले. असे प्रेम सह तिथे उपस्थित इतर पालकांचे म्हणणे आहे. एस व एस परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी गोपाल नगर किंवा सीमा कॉलेज या दोन रेल्वे फाटक आहे. प्रेम वानखेडे ज्यावेळी केंद्राकडे जात होता त्यावेळी रेल्वे फाटक बंद होते त्यामुळे त्याला नियोजित वेळेत परीक्षा केंद्र पोहोचता आले नाही. हे बघ त्याच्यासोबत असलेल्या त्याचे आई, तू स्वतः आणि तिथे उपस्थित इतर पालकांनी प्रवेश दारावरील सुरक्षा लक्षात आणून दिले परंतु त्या सुरक्षारक्षकाने फोन लावून विचारण्यात तर वेळ गमावला असे उपस्थित आमचे निरीक्षण आहे. या दरम्यान वेळ आणखीन पुढे गेली णि केंद्राधिकार्‍यांनी वास्तविकता लक्षात न घेता सदर विद्यार्थ्याला हात घेता येणार नाही, अशी आळ मोठी भूमिका घेतली गरीबाच्या परिस्थितीतून पुढे येण्याची धडपड करणाऱ्या प्रेमाची आई या प्रकरणामुळे अत्यंत व्यथीत झाली होती. उपस्थित पालकांनीही त्या विद्यार्थ्याला आत सोडण्यात यावा अशी विनंती केली परंतु केंद्रधिकार्‍याच्या आदेश आहे त्याला सोडता येणार नाही असे सुरक्षारक्षकाचे म्हणणे होते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे अख्खे वर्ष वाया गेले आहे. पेपरची वेळ साडेदहा वाजताची असली तरी सदर विद्यार्थ्याला १०. वाजेपर्यंत केंद्र पोहोचायचे होते ती न पडल्या गेल्यामुळे त्याला आज प्रवेश देता आला नाही. मी निर्मला बादल असल्याने इच्छा असूनही त्यांच्यासोबत न्याय करता आला नाही.

Previous articleशिव केसरी 2024 कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी.
Next articleअमरावती येथे खुले हॉलीबॉलस्पर्धा. माजी नगरसेवक श्री विवेक भाऊ कलोती यांच्या हस्ते उद्घाटन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here