Home उतर महाराष्ट्र प्रा. अक्षय तेलोरे यांच्या कथा संग्रहाचे दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते प्रकाशन.

प्रा. अक्षय तेलोरे यांच्या कथा संग्रहाचे दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते प्रकाशन.

102

आशाताई बच्छाव

IMG_20240217_201318.jpg

प्रा. अक्षय तेलोरे यांच्या कथा संग्रहाचे दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते प्रकाशन.
श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम तालुका प्रतिनिधी) श्रीरामपूर येथील प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे यांच्या निखळ या कथासंग्रहाचे तृतीयपंथी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते दिनांक १४ फेब्रुवारी रोजी प्रकाशन करण्यात आले.
प्रा. तेलोरे यांचा निखळ हा कथा संग्रह हा प्रेम कथा संग्रह असून, प्रेम या शब्दाचा खारा अर्थ व त्याची खरी किंमत ही तृतीयपंथी समाजाला जास्त असते आणि याच भावनेतून प्रा. तेलोरे यांनी आपल्या कथा संग्रहाचे प्रकाशन तृतीयपंथी व्यक्तीच्या हस्ते व्हावे असा मानस बाळगून त्यांनी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन तृतीयपंथी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते केले. प्रा. अक्षय तेलोरे यांचा या पूर्वी मोडके शब्द नावाचा काव्य संग्रह प्रकाशित झाला असून निखळ हा कथा संग्रह हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. त्यांच्या या कथा संग्रहाला दिशा पिंकी शेख यांनी शुभेच्छा देत आपल्या हातून पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिल्या बद्दल आभारही मानले. तसेच प्रा. तेलोरे यांच्या पुढील लिखाणास व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.