Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील बलात्कारी भोंदू गुरुदास बाबास भोपाळ मधून अटक.एलसीबीची कारवाई.

अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील बलात्कारी भोंदू गुरुदास बाबास भोपाळ मधून अटक.एलसीबीची कारवाई.

151

आशाताई बच्छाव

IMG_20240209_171816.jpg

अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील बलात्कारी भोंदू गुरुदास बाबास भोपाळ मधून अटक.एलसीबीची कारवाई.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
तिवसा तालुक्यातील मार्डी येथील बलात्कारी गुरुदास भोंदू बाबाच्या पोलिसांना मुस्क्या आवडण्यात अखेर यश आले.दी.८ गुरुवार फेब्रुवारी रोजी रात्री ११च्या सुमारास त्याला मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका लाज बाहेरून अटक करण्यात आली.९ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याला अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालय आणण्यात आले. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका ३५ वर्षीय महीलेच्या तक्रारीवरून कुह्रा तालुका तिवसा पोलीस स्टेशन मधे२५ जानेवारीला रात्री मार्डी येथील सुनील कावलकर उर्फ गुरुदास बाबा (वय४७) या भोंदू बाबा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी अन्य एका महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदविण्यात आला. त्याच्या शोधार्थ पोलीस पथके नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, वर्धा येथील त्याचे आश्रम व घर तथा मध्य प्रदेशातील काही ठिकाणी काही ठीकाणी जाऊन आले. मात्र तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुरुदास बाबाच्या एका भक्ताच्या हालचालीवर लक्ष ठेवले. अखेर एफ आय आर च्या १४व्या दिवशी ८ फेब्रुवारी रोजी त्याच्या भक्ताच्या माध्यमातून सुनील कावलकर उर्फ गुरुदास बाबा हा दिल्लीहून भोपाळला येत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्या आधारे एलसीबीच्या पथकाने गुरुवारी भोपाळ गाठले . तथा खास माहितीच्या आधारे त्याला गुरुवारी रात्री भोपाळ रेल्वे स्टेशन लगतच्या एका लॉज बाहेरून ताब्यात घेतले. ओळख पटविल्यानंतर पोलीस खात्यातील एलसीबी चे पथक त्या गुरुदास बाबाला घेऊन शुक्रवारी सकाळच्या सुमारास अमरावतीत पोहोचले. येथे आल्यानंतर अप्पर अधीक्षक पंकज कुमावत तथा चांदुर रेल्वेच्या सह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांच्यासमोर त्याची पेशी झाली. त्याला शुक्रवारी दुपारी तिवसा न्यायालयात हजर करण्यात आले. गरम तव्याच्या कोपऱ्यावर बसून भक्तांना असली स्वीकार करणाऱ्या भोंदू महाराज गुरुदास बाबाच्या व्हिडिओ मार्च २०२३ रोजी व्हायरल झाला होता हे विशेष.

Previous articleअनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा- यश चव्हाण
Next articleयुवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास-विशेष युवक शिबिराचे समारोप संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.