Home जळगाव मुंबई पोलीस शुभम आगोणे हत्याप्रकरणातील एका आरोपीला धुळ्यातून अटक

मुंबई पोलीस शुभम आगोणे हत्याप्रकरणातील एका आरोपीला धुळ्यातून अटक

472

आशाताई बच्छाव

IMG_20240209_074007.jpg

मुंबई पोलीस शुभम आगोणे हत्याप्रकरणातील एका आरोपीला धुळ्यातून अटक
प्रतिनिधी/चाळीसगाव -विजय पाटील 
14 जानेवारी 2024 रोजी मुंबई पोलीस दलातील शुभम आगोणे याचा खून करण्यात आला होता त्यातील काही आरोपी घटना स्थळावरून ताब्यात घेण्यात आले होते तर काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा. रजी. क्रमांक. 24/2024 भादवी 302, 307, 324, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 व इतर अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी सिद्धांत आनंदा कोळी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता, त्याचा व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आलेले होते.
आरोपीचा शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि सागर ढिकले, पो.ना. राहुल सोनवणे, पो.शी. आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, प्रकाश पाटील यांनी सिद्धांत आनंदा कोळी, वय 27 वर्षे, रा. छाजेड ऑइल मिल पाठीमागे, घाट रोड, चाळीसगाव याला शिरूड चौफुली, धुळे रोड ता. जि. धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याला चाळीसगांव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.*

Previous articleविश्वकर्मा योजना वेबसाईट बंदमुळे लाभार्थी जेरीस
Next articleअनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा- यश चव्हाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.