Home नांदेड लोहा न.पा.च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविल्याबद्दल लांडेवाडी...

लोहा न.पा.च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविल्याबद्दल लांडेवाडी येथे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा धर्मगुरू म.न.प.श्री संगनबसवेश्वर महाराज स्वामी यांच्या हस्ते भव्य सत्कार

208

आशाताई बच्छाव

IMG_20240205_182025.jpg

लोहा न.पा.च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविल्याबद्दल लांडेवाडी येथे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा धर्मगुरू म.न.प.श्री संगनबसवेश्वर महाराज स्वामी यांच्या हस्ते भव्य सत्कार

लोहा प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार

समतेचे पुरस्कर्ते क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा लोहा न.पा.च्या प्रगणांत लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी बसविल्याबद्दल त्यांचा लोहा तालुक्यातील मौ. लांडेवाडी येथे धर्मगुरू शिवाचार्य म.न.प्र.श्री संगनबसवेश्वर महाराज स्वामी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.माहाराजानी भरभरून आशीर्वाद दिला.
यावेळी सरपंच बाळासाहेब टोपारे, उपसरपंच सचितानंद बल्लोरे जनार्दन लांडगे, यांच्या सहित मोठ्या संख्येने वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले की, लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा ही माझी संकल्पना होती..
यात लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा व लोहा न.पा. प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण ही लवकरच करण्यात येईल व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.
तसेच लोहा शहरांची तहान भागवण्यासाठी लिंबोटी धरणाचे पाणी आणण्यासाठी ६६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
तसेच जुना लोहा येथे लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न सोडविला लिंगायत स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून दिली.
तसेच शहरात ४० ते ५० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते व नाल्या केल्या.
लांडेवाडी येथील लिंगायत समाज बांधवांनी मला येथे बोलावून माझा मान सन्मान केला मी त्यांचा आभारी आहे लिंगायत समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदा तत्पर आहे असे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले.

Previous articleसिन्नर फाट्यावर पायी यात्रेकरू भाविकांना फळे वाटप
Next articleसुंदरता हा कलेचा आत्‍मा —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.